'दिल्ली'चा दमदार विजय 

बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे: संजू सॅमसनच्या घणाघाती शतकी खेळीनंतर ख्रिस मॉरिसच्या धडाक्‍यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने काल (मंगळवार) यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघावर दणदणीत विजय मिळविला. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकाविणारा संजू सॅमसन हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या धडाक्‍यानंतर ख्रिस मॉरिसने नऊ चेंडूंत तीन षटकार आणि चार चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या. रिषभ पंतने 22 चेंडूंत 31 धावा करून उपयुक्त योगदान दिले. 

या तिघांच्या कामगिरीमुळे दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 205 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पुण्याच्या संघाला दिल्लीने सुरवातीपासूनच धक्के दिले. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने गोलंदाजीत कल्पक बदल करत पुण्याला अडचणीत आणले. झहीरने स्वत: तीन गडी बाद केले. अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने तीन, तर पॅट कमिन्सने दोन गडी बाद केले. शाहबाझ नदीम, ख्रिस मॉरिस यांना प्रत्येकी विकेट मिळाली. 

पुण्याच्या संघाकडून सलामीवीर मयांक अगरवालच्या 20 धावा याच सर्वोच्च ठरल्या. पुण्याचा डाव 108 धावांत संपुष्टात आला.