निगडी-प्राधिकरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

निगडी - ‘सकाळ’ने इको फ्रेंडली गणेशोत्सवाची घातलेली साद आणि गणेश मंडळांचा प्रतिसाद यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव निगडी-प्राधिकरणात साजरा होताना दिसत आहे. शाडूमातीच्या मूर्ती, सामाजिक संदेश, ध्वनिप्रदूषणाची काळजी, खर्चीक उत्सवाला फाटा असे सामाजिक भान राखल्याचे परिसरात दिसत आहे.

निगडी - ‘सकाळ’ने इको फ्रेंडली गणेशोत्सवाची घातलेली साद आणि गणेश मंडळांचा प्रतिसाद यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव निगडी-प्राधिकरणात साजरा होताना दिसत आहे. शाडूमातीच्या मूर्ती, सामाजिक संदेश, ध्वनिप्रदूषणाची काळजी, खर्चीक उत्सवाला फाटा असे सामाजिक भान राखल्याचे परिसरात दिसत आहे.

प्राधिकरण
सिंधुनगर युवक मित्र मंडळाने यंदा सामाजिक संदेश देणारा घडलंय-बिघडलंय हा जिवंत देखावा सादर केला आहे. मोबाईल वापर, वाहतूक नियंत्रक नियमांचे पालन, पाणी वाचवा अशा विविध समस्यांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे ३८ वे वर्ष आहे. योगेश पवार अध्यक्ष असून, मंडळाने शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 
शरयुनगर प्रतिष्ठानने यंदा विद्युत रोषणाई केली असून दोर मल्लखांब, देशभक्तिपर गीते, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक यांचे नियोजन करून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शाडू मातीची मूर्ती विसर्जनासाठी असेल असे अध्यक्ष परेश लोके यांनी सांगितले.

वरदविनायक प्रतिष्ठानने यंदा विद्युत रोषणाई व महल साकारून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दुर्गेश्वर मित्र मंडळाची शाडूची मूर्ती विसर्जनासाठी असून, साधेपणाने यंदा विद्युत रोषणाई करून गणेशोत्सव साजरा केला आहे. नगरसेवक अमित गावडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. विशाल देवकर अध्यक्ष असणाऱ्या विश्वेश्वर मित्र मंडळाची साडेबारा फुटांची उंचीची नंदीवरील मूर्ती लक्षवेधक आहे.

निगडी
दत्तात्रेय पवळे अध्यक्ष असणारे जय बजरंग तरुण मंडळाचे यंदा ६० वे वर्ष आहे. कालिकामातेचा महिमा हा भव्य हलता देखावा सादर केला असून, मंडळ शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहे.

ओम शिवतेज मित्र मंडळाचा गजमहल लक्षवेधक आहे. समीर जावळकर अध्यक्ष असणाऱ्या मंडळाने शाडू मातीची मूर्ती विसर्जनासाठी ठेवली आहे. सूरज चव्हाण अध्यक्ष असणाऱ्या शिवछत्रपती मंडळाने स्त्रीभ्रूण हत्या रोखा हा संदेश जिवंत देखाव्यातून दिला आहे. जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष मंगेश काळभोर असून, फुलांची आरास येथे केली आहे.

यमुनानगर
सुवर्णयुग मित्र मंडळाने यंदा साधेपणाने उत्सव साजरा केला असून, मंडळाचे २५ वे वर्षे आहे. योगेश मोरे मंडळाचे अध्यक्ष आहेत. रवींद्र खिलारे अध्यक्ष असणाऱ्या शिवप्रेमी मित्र मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. सिद्धिविनायक तरुण मंडळाने याही वर्षी रोपे वाटप करून महल व विद्युत रोषणाई केली आहे. ज्ञानेश्वर पुरोहित मंडळाचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आदित्य खोले अध्यक्ष असणाऱ्या शिवराज तरुण मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. बहुतांश मंडळ शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.