सुंदर नारायण मंदिरात बहरले 'कलांगण'

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक : गोदा काठावर वसलेल्या श्री सुंदर नारायण मंदिर परीसरात रंग-रेषांची कॅनव्हासवर सुरू असलेली उधळण. परीसरातील सौंदर्य टिपण्याची चित्रकारांची धडपड. चित्रकारांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तितक्‍याच ताकदीनं अभिनय सादरीकरण अन्‌ कविता लयबद्ध वाचन, असे उल्हासमयी वातावरण कार्यक्रम स्थळी अनुभवायला मिळाले. "सकाळ-कलांगण'च्या आजच्या उपक्रमात चित्रकार, कलावंतांना दाद देण्यासाठी कलाप्रेमींनीही गर्दी केली होती. सुंदर नारायण मंदिर प्रांगणात "सकाळ-कलांगण' बहरले होते.

(छायाचित्रे- सोमनाथ कोकरे)