ओझरला भाविकांची गर्दी

सोमवार, 25 डिसेंबर 2017

जुन्नर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहराचे पाच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष शकुजी कवडे यांनी सांगितले. तीनही दिवस दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठया रांगा लागलेल्या दिसत होत्या. सलग सुट्टी आल्याने देवस्थानने भाविकांना अडचणी येऊ नये यासाठी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. निवास, वाहनतळ, पाणी, दर्शनरांग, प्रसाद याची चोख व्यवस्था ठेवली होती.