असे केक पाहिलेत...?

शनिवार, 20 जानेवारी 2018

वेगवेगळ्या प्रकारचे केक डिझाईन करणे ही देखील एक कला आहे. चीनी केक डिझायनर झोऊ यी यांनी देखील काही केक डिझाईन केले आहेत. ही केकची डिझाईन्स थक्क करणारी आहेत.

अशा प्रकारचे केक डिझाईन करणाऱ्यांना पॅटिशियर म्हणतात. पॅटिशियर झोऊ यी हे चीनमध्ये 'शुगर किंग' म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय केक स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत तीनदा सुवर्णपदक पटकावले आहे.

हे केक बघायला जेवढे छान वाटतात तेवढेच ते करण्यासाठी अवघड आहेत. झोऊ यी यांनी 'चायना डेली'शी बोलताना सांगितले की, ''काही वेळेस केकचा एखादा भाग बरोबर होण्यासाठी पुन्हा पन्हा करावा लागतो. यासाठी बराच वेळ आणि संय्यम लागतो''.

त्यांनी डिझाईन केलेल्या केकची अनेकदा प्रदर्शन भरविण्यात येतात. अनेक ठिकाणाहून लोक हे प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी करतात. शांघाय येथे झोऊ यी अनेकदा केक तयार करण्याची कार्यशाळा देखील घेतात. त्यामध्ये तयार करण्यात आलेल्या केकचे फोटो ते सोशल मिडियावर वेळोवेळी शेअर करतात. त्याच्या केकचे फोटो देखील अनेकदा व्हायरल होत असतात.