sakal

बोलून बातमी शोधा

गूळ खाण्याचे जबदस्त फायदे जाणून घ्या

गूळ खाण्याचे जबदस्त फायदे जाणून घ्या

सामान्यत: लोक फक्त हिवाळ्यात गूळ वापरतात. परंतु वर्षभर गूळ खाल्ले तर शरीराला त्यातून बरेच फायदेही मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात गूऴ खाण्याचे फायदे.

दिवसभर शरीर ऍक्टिव्ह राहील:

गूळ शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवते. शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी, दुधासह गूळ सेवन केल्याने शक्ती प्राप्त होते आणि शरीर अॅक्टिव्ह राहते. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर गूळ, लिंबाचा रस आणि काळे मीठ एक कप पाण्यात सेवन केल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

दिवसभर शरीर ऍक्टिव्ह राहील: गूळ शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवते. शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी, दुधासह गूळ सेवन केल्याने शक्ती प्राप्त होते आणि शरीर अॅक्टिव्ह राहते. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर गूळ, लिंबाचा रस आणि काळे मीठ एक कप पाण्यात सेवन केल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

पोटाच्या समस्यांपासून दूर व्हा:

पोटाशी संबंधित अनेक समस्यांसाठी गुळ हा एक रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसिड‍िटीची तक्रार असेल तर गुळ खाणे फायद्याचे ठरेल.

पोटाच्या समस्यांपासून दूर व्हा: पोटाशी संबंधित अनेक समस्यांसाठी गुळ हा एक रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसिड‍िटीची तक्रार असेल तर गुळ खाणे फायद्याचे ठरेल.

फुफ्फुसांचा संसर्ग प्रतिबंधित करते:

गुळ शरीरातील रक्त स्वच्छ करून मेटाबॉलिज्म रेट (चयापचय दर) नियंत्रित करते. या व्यतिरिक्त घसा आणि फुफ्फुसातील संसर्गांवर उपचार करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

फुफ्फुसांचा संसर्ग प्रतिबंधित करते: गुळ शरीरातील रक्त स्वच्छ करून मेटाबॉलिज्म रेट (चयापचय दर) नियंत्रित करते. या व्यतिरिक्त घसा आणि फुफ्फुसातील संसर्गांवर उपचार करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

सांधेदुखी दूर होते:

आल्याबरोबर गूळाचा वापर सांधेदुखीच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतो. दररोज गुळाच्या तुकड्याने आले खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

सांधेदुखी दूर होते: आल्याबरोबर गूळाचा वापर सांधेदुखीच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतो. दररोज गुळाच्या तुकड्याने आले खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

हाडे मजबूत करते:

गूळमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहेत.

हाडे मजबूत करते: गूळमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहेत.

टॅग्स :lungsstomachjaggery