sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra: राहूल गांधींसोबत यात्रेत सहभागी झालेले कलाकार...

Bharat Jodo Yatra

सप्टेंबरमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली. कन्याकुमारी ते श्रीनगर भारत जोड़ो यात्रेत राहुल गांधी सुमारे 150 दिवसांत 12 राज्य कव्हर करत 3750 किलोमीटरचे अंतर कापतील. ही यात्रा आता मध्य प्रदेशात पोहोचली आहे. या प्रवासात राहुल गांधींचे सोबत चाललेले कलाकार...

अभिनेत्री पूजा भट्टने भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. पूजा आणि राहुलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पूजा राहुलसोबत सुमारे 10 किमी चालली होती.

पूजा भट्टनंतर राहुल यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये सुशांत सिंगचे  नावही आहे. सुशांत सिंगने सांगितले होते की, मी पहिल्यांदाच राजकीय प्रवासात सहभागी झालो आहे.

अभिनेत्री रश्मी देसाईच्या नावाचाही समावेश आहे. रश्मी आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी राहुल गांधींच्या भेटीला एकत्र हजेरी लावली होती..

 आकांक्षा पुरी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. राहुल गांधींचा हात धरून चालतानाचे दोन्ही अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडले.

 बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून न दिसणारी अभिनेत्री रिया सेनही देखील राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत दिसली होती. राहुल गांधी आणि रिया यांच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली होती.

अमोल पालेकर आणि संध्या गोखलेही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले होते.