Photo : जंगलातल्या गव्याची सांगलीत दहशत; यार्डात येताचं नाकेबंदी

वन विभागाने पुण्याहून खास रेस्क्यू टीमला पाचारण केले.
Bision
BisionEsakal

सांगली : कृष्णा नदीच्या (Krusha River) पल्याड शनिवारी रात्री दिसलेल्या गव्याने (Bision) ऐतिहासिक असा आयर्विन पूल ओलांडला आणि ऐटदार चाल करत तो अखेर सांगलीत (Sangli)दाखल झाला. सांगलीच्या गणरायाचे मंदिर, आमराई, शिवाजी क्रीडांगण, टिंबर एरिया, वसंतदादा कॉलनी असा फेरफटका मारत वसंतदादा पाटील यांनी वसवलेल्या मार्केट यार्डात स्वारी आली आणि सांगलीकरांनी यार्डाचे दोन्ही दरवाजे बंद करून त्याची नाकेबंदी करून टाकली. पहाटे साडेपाचपासून शेकडो तरुण त्याच्या मागावर होते. फोटो काढा, व्हिडिओ काढा, पोलिसांना कळवा, नाकाबंदी करा, असा सारा प्रकार सुरु होता.

गवा मात्र निवांत रमत गमत चालत पुढे जात होता. त्याची वाटेत भटक्या गायींच्या कळपाशी भेट झाली. तो तेथे थोडा रेंगाळला, काही टक्कर नाही किंवा भांडण नाही. तो आपल्या मार्गाने निघून गेला. कुत्री भुंकत राहिली, त्याच्यावर काहीची परिणाम झाला नाही. वसंतदादा मार्केट यार्डमध्ये आल्यानंतर मात्र यंत्रणेला ‘अब गवा आया पहाड के निचे’चा आनंद झाला. त्यांनी त्याची पूर्ण नाकाबंदी करून टाकली. तो आता हालणार नाही, याची खबरदारी घेतली आणि येथील वन विभागाने पुण्याहून (Pune) खास रेस्क्यू टीमला पाचारण केले. या गोंधळात पोलिस, पत्रकार, प्राणीमित्र आणि असंख्य बघ्यांनी दहशतीचे वातावरण आहे, असाच कल्ला उठवला. त्याची थोडक्यात छायांकित झलक. (छायाचित्रे - उल्हास देवळेकर आणि सोशल मिडियातून साभार)गवा आल्याची बातमी समजताच सांगलीकरांनी वसंतदादा मार्केट यार्डासमोर गर्दी केली. पोलिसांनी यार्डचे दोन्ही बाजूचे दरवाजे बंद करून लोकांना बाहेरच थांबवले, मात्र उशीरापर्यंत गर्दी कायम होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com