Photo : अमरावती ते लीलावती; नवनीत राणांचा पाहा चित्रमय प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : अमरावती ते लीलावती; नवनीत राणांचा पाहा चित्रमय प्रवास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा राणा दाम्पत्यानं पत्रकार परिषदेद्वारे केली होती. (फोटो - ट्वीटर)

राणा दाम्पत्याचा मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचा आग्रह धरल्यानं शिवसैनिकांसोबत मोठा संघर्ष झाला होता. त्यामुळं कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं होतं. (फोटो - ट्वीटर)

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ, सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलिसांत तक्रार दिली होती. (फोटो - ट्वीटर)

खार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राणा दाम्पत्याची सांताक्रुझ पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली होती. (फोटो - ट्वीटर)

आपण मागासवर्गीय असल्यानं खार पोलिसांनी पाणीही दिलं नाही तसंच टॉयलेटही वापरु दिलं नाही असा आरोप केला होता. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटज जाहीर केलं होतं. यामध्ये राणा दाम्पत्य चहापानासह पोलिसांचा पाहुणचार घेताना दिसत आहेत. (फोटो - ट्वीटर)

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाच्या कलमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा यांची भायखाळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली. (फोटो - ट्वीटर)

राणा दाम्पत्यांचा जामीन १२ दिवसांनंतर कोर्टानं मंजूर केल्यानंतर आधी नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातच त्यांचा स्पॉंडिलाईसिसचा आजार बळावला असल्यानं त्यांना बाहेर आल्यानंतर खासगी कारमधून लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी तुरुंगाबाहेर येताच त्यांनी माध्यमांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तर केवळ हात जोडून आभार मानले. (फोटो - ट्वीटर)

भायखाळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणार आहेत. (फोटो - ट्वीटर)

दरम्यान, रवी राणा यांची देखील तळोजा तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यात भगवा पंचा टाकत हातात हनुमान चालिसाचं पुस्तकं घेऊन माध्यमांच्या फोटोग्राफर्सना पोझ दिली. (फोटो - ट्वीटर)

यानंतर रवी राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली. तब्बल १२ दिवसानंतर दोघांची भेट झाल्यानं नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. (फोटो - ट्वीटर)

go to top