Uddhav Thackeray Latest Speech | 'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर..

Uddhav Thackeray Speech
राज ठाकरे आणि मुन्नाभाई : "मुन्नाभाई चित्रपटात जसं त्याला गांधीजी दिसतात, तसं एकाला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. भगवी शाल घालून फिरतो.कधी मराठी, कधी हिंदुत्वाचा मुद्दा काढतो.  पण चित्रपटात मुन्नाभाईला शेवटी कळतं की केमिकल लोचा झाला आहे. हे पण तसंच आहे".

मराठीचा अभिजात दर्जा : "छत्रपती शिवरायांच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाही, असं करंटं सरकार तिथं बसलंय. पुरातत्व खातं औरंगजेबाची कबर राखतं आणि मंदिरांच्या जिर्णोद्धाराला नकार देतं. देवेंद्रजी, तिकडे जाऊन विरोध करा. असे अनेक प्रकल्प आहेत, जिथे केंद्राने अडवणूक केलीये".

आम्ही हिंदुत्व सोडलं नाही : "आमचं हिंदुत्व खरं की खोटं हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व काय धोतर आहे का? कधी नेसलं, कधी सोडलं..हिंदुत्व ही धरण्याची-सोडण्याची गोष्ट आहे का? काँग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही उघडपणे राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत गेलो".

मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला तर : "हिंदुत्व आमचा श्वास आणि मराठी आमचा प्राण आहे, हे सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही. मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलीये. मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाही".

भाजपा तरी अटलजींचा राहिला आहे का? : "पेट्रोल ७ पैश्यांनी वाढलं म्हणून अटल बिहारी वाजपेयी संसदेत बैलगाडीवर आले होते. शिवसेना जर बाळासाहेबांची राहिली नसेल, तर भाजपा तरी वाजपेयींची राहिली आहे का?"

संघ स्वातंत्र्यलढ्यात कधीच नव्हता :  "भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावेळी संघ कुठे होता? स्वातंत्र्यलढ्यात संघाचं योगदान नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सगळ्यात आधी कोण फुटलं तर यांचा बाप, म्हणजे संघ. तेव्हापासून मुंबईचे लचके तोडणं सुरू आहे".

दाऊदला मंत्रीपद देतील : "आता ह्यांनी दाऊदचा मुद्दा उचलून धरलाय. उद्या त्याला भाजपातही घेतील, मंत्री करतील. आत्ता स्वतःच त्याच्या मागे लागले असतील. त्याला मंत्री करून म्हणतील की काही नाही हो, दाऊद म्हणजे सद्गुणाचा पुतळा आहे".

हनुमानाचा अपमान करू नका : "हनुमानाचा, देवदेवतांचा अपमान करू नका, ते हृदयात असावं लागतं. स्तोत्र, प्रार्थना आम्ही लहानपणापासून शिकलो आहोत. अगदी अर्जुनाच्या दुर्गास्तोत्रापासून आम्हाला सगळं काही येतं. ही सभा नाही, हिंदुत्वाचा उत्सव आहे. राम हृदयात असावा".

तुमच्या वजनाने बाबरी पडली असती : "देवेंद्रजी, बाबरी पडली तेव्हा तुमचं वय नक्की काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती का? आज मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं? तुम्ही बाबरी पाडायला गेला असता तर तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती".

go to top