दिलीप वेंगसरकरांचा ‘तो’ रेकॉर्ड सचिन तेंडुलकरलाही मोडता आला नाही

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला.
Dilip Vengsarkar
Dilip Vengsarkarसकाळ डिजिटल टीम
Updated on

दिलीप वेंगसरकर यांचा समावेश भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होतो. दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. ७०च्या अखेरच्या दशकात आणि ८०च्या सुरुवातीला ते भारतीय संघातील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जातात.

वेंगसरकरांनी 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर 1987 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत 2 शतके ठोकली होती.
वेंगसकर यांनी 10 कसोटी सामन्यात भारताने नेतृत्व केले.
वेंगसरकरांनी 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर 1987 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत 2 शतके ठोकली होती. वेंगसकर यांनी 10 कसोटी सामन्यात भारताने नेतृत्व केले.
वेंगसरकर यांना अर्जुन पुरस्कार तसेच विस्डनचा क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे. तसेच क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे बीसीसीआयने त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारही दिला आहे.
वेंगसरकर यांना अर्जुन पुरस्कार तसेच विस्डनचा क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे. तसेच क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे बीसीसीआयने त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारही दिला आहे.
वेंगसरकरांनी १९८३ ते १९८७ या काळात जागतिक क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी केली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सलग तीन शतक करणारे इंग्लंडच्या बाहेरचे पहिले फलंदाज होते. भारताकडून अशी कामगिरी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज फलंदाजांना देखील करता आली नाही. या दोघांना लॉर्ड्स मैदानावर एकही शतक करता आले नाही.

वेंगसरकर यांनी निवृत्तीनंतर मुंबईमध्ये ईएलएफ वेंगसकर अकॅडमी (Elf-Vengsarkar academy) ही स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरु केली. त्यांनी काही काळ बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम पहिले होते.. विराट कोहलीला 2008 ला भारतीय संघात संधी द्यावी असा आग्रह त्यांचाच होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com