PHOTO : पारंपारिक महाराष्ट्रीयन 'लुक'सह करा बाप्पाचं स्वागत; दिसाल खास

गणेश चतुर्थी दिवशी बहुतांश महिला महाराष्ट्रीयन वेशभूषा करतात.
ganeshotsav 2022
ganeshotsav 2022
Updated on
Summary

सध्या गणरायाच्या आगमणाते वेध लागले आहेत. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव राहिला असल्यानं तयारींना वेग आलाय. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजन गणरायाच्या आगमणाच्या गडबडीत व्यस्त आहेत. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी दिवशी बहुतांश महिला महाराष्ट्रीयन वेशभूषा करतात. पारंपारिक वेशभुषा करत बाप्पाचे स्वागत केले जाते.

यंदा दोन वर्षांनंतर थाटात बाप्पाचं आगमन होतं आहे. विशेषत: महिलांमंडळ बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळी तयारी करत असतात. पारंपारिक पद्धतीने साडी आणि दागिण्यांच्या शृंगारासह महिलावर्ग बाप्पाच्या आगमणासाठी तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, यंदा बाप्पाच्या आगमणासाठी तुम्हालाही जर महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल, तर या गोष्टी जवळ असणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा लूक उठावदार होईल. त्यामुळे या गोष्टींची यादी तुम्ही जवळ ठेवा...

नऊवारी 

एक महाराष्ट्रीयन शैलीची साडी आहे जिला नऊवारी असे म्हणतात. ही साडी नऊ मीटरची असते. विविध रंगाची आणि नक्षीदार कोरीवकाम केलेली ही साडी नेसायला धोती पद्धतीची असते. तुम्हाला धोती स्टाईलमध्ये ही साडी नेसावी लागेल किंवा तशी तयार करून घ्यावी लागेल. परंपरेने बहुतेक वधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी ही साडी परिधान करतात आणि ही साडी वधूचे सौंदर्य वाढवण्यात महत्वाचा दुवा मानली जाते.
नऊवारी एक महाराष्ट्रीयन शैलीची साडी आहे जिला नऊवारी असे म्हणतात. ही साडी नऊ मीटरची असते. विविध रंगाची आणि नक्षीदार कोरीवकाम केलेली ही साडी नेसायला धोती पद्धतीची असते. तुम्हाला धोती स्टाईलमध्ये ही साडी नेसावी लागेल किंवा तशी तयार करून घ्यावी लागेल. परंपरेने बहुतेक वधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी ही साडी परिधान करतात आणि ही साडी वधूचे सौंदर्य वाढवण्यात महत्वाचा दुवा मानली जाते.
नथ 

पारंपारिक मराठी लुकवर नाकात नथ असणे हे अनिवार्य असावं असं म्हटलं जातं. त्याशिवाय या लुक पूर्ण होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन लुकसाठी नथ खूप महत्वाची आहे. मण्यांनी बनवलेली मोत्यांची नथ किंवा नाक टोचलच नसेल तर मग प्रेस करायची नथ असे काही प्रकार यामध्ये मिळतात. महाराष्ट्रीयन नथींना एक विशिष्ट आकार असतो. आजकाल या नथींच्या अनेक डिझाईन्स बाजारात आल्या आहेत.
नथ पारंपारिक मराठी लुकवर नाकात नथ असणे हे अनिवार्य असावं असं म्हटलं जातं. त्याशिवाय या लुक पूर्ण होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन लुकसाठी नथ खूप महत्वाची आहे. मण्यांनी बनवलेली मोत्यांची नथ किंवा नाक टोचलच नसेल तर मग प्रेस करायची नथ असे काही प्रकार यामध्ये मिळतात. महाराष्ट्रीयन नथींना एक विशिष्ट आकार असतो. आजकाल या नथींच्या अनेक डिझाईन्स बाजारात आल्या आहेत.
महाराष्ट्रीयन ज्वेलरी

सोन्याचे दागिने पारंपारिक महाराष्ट्रीय दागिने तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हेच दागिने या साडीवर उठून दिसतात. कोणतीही आधुनिक किंवा वेस्टर्न ज्वेलरी उठून दिसणार नाही. यासाठी तुम्ही ठुशी, कोल्हापूर साज, कोल्हापुरी साज, तोडे, मोहन माळ, कानवेल अशी काही ज्वेलरी परिधान करु शकता.
महाराष्ट्रीयन ज्वेलरी सोन्याचे दागिने पारंपारिक महाराष्ट्रीय दागिने तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हेच दागिने या साडीवर उठून दिसतात. कोणतीही आधुनिक किंवा वेस्टर्न ज्वेलरी उठून दिसणार नाही. यासाठी तुम्ही ठुशी, कोल्हापूर साज, कोल्हापुरी साज, तोडे, मोहन माळ, कानवेल अशी काही ज्वेलरी परिधान करु शकता.
चंद्रकोर टिकली (बिंदी)

मराठी नऊवारी साडीच्या लूकसाठी चंद्रकोराच्या आकाराची टिकली कपाळाला लावल्यास तो लुक खुलून दिसेल. तु्म्ही ही चंद्रकोर साडीच्या मॅचिंगनुसार बाजारातून खरेदी करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओल्या कुंकुपासूनही अशी चंद्रकोर बनवू शकता.
चंद्रकोर टिकली (बिंदी) मराठी नऊवारी साडीच्या लूकसाठी चंद्रकोराच्या आकाराची टिकली कपाळाला लावल्यास तो लुक खुलून दिसेल. तु्म्ही ही चंद्रकोर साडीच्या मॅचिंगनुसार बाजारातून खरेदी करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओल्या कुंकुपासूनही अशी चंद्रकोर बनवू शकता.
बांगड्या

बांगड्या जवळजवळ सर्वच प्रदेशांत त्यांच्या संस्कृतींनुसार परिधान केल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रीयन लुकसाठी तुम्ही भरपूर हिरव्या बांगड्या हातामध्ये घालू शकता. यामुळे लुकला एक वेगळचं सौंदर्य दिसून येईल. याशिवाय मध्यभागी तुम्ही तुमच्या आवडीच्या बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्या चढवू शकता.
बांगड्या बांगड्या जवळजवळ सर्वच प्रदेशांत त्यांच्या संस्कृतींनुसार परिधान केल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रीयन लुकसाठी तुम्ही भरपूर हिरव्या बांगड्या हातामध्ये घालू शकता. यामुळे लुकला एक वेगळचं सौंदर्य दिसून येईल. याशिवाय मध्यभागी तुम्ही तुमच्या आवडीच्या बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्या चढवू शकता.
गजरा

केसांना सुंदर सजवण्यासाठी तु्म्ही गरऱ्याचा वापर करु शकता. तुमचा महाराष्ट्रीयन लुक याशिवाय पूर्ण होत नाही. केसांना आंबाडा आणि त्याला गोल नक्षीदार गजरा असल्याशिवाय या लुक उठावदार दिसत नाही. मोगऱ्याचा गजरा किंवा काही गुलाबाची फुले लावूनही तुम्ही केसांना सजवू शकता.
गजरा केसांना सुंदर सजवण्यासाठी तु्म्ही गरऱ्याचा वापर करु शकता. तुमचा महाराष्ट्रीयन लुक याशिवाय पूर्ण होत नाही. केसांना आंबाडा आणि त्याला गोल नक्षीदार गजरा असल्याशिवाय या लुक उठावदार दिसत नाही. मोगऱ्याचा गजरा किंवा काही गुलाबाची फुले लावूनही तुम्ही केसांना सजवू शकता.
कोल्हापूर चपला

नऊवारी साडी नेसली म्हणजे पायात कोल्हापूरी चपला घालावीच लागते. यावर इतर कोणताही वेस्टर्न जोडा उठून दिसत नाही. त्यामुळे या साडीवर तुम्ही पारंपारिक कोल्हापूरी जोडच घालू शकता. त्यामुळे तुमचा लुक एकदम मराठमोळा आणि उठून दिसेल.
कोल्हापूर चपला नऊवारी साडी नेसली म्हणजे पायात कोल्हापूरी चपला घालावीच लागते. यावर इतर कोणताही वेस्टर्न जोडा उठून दिसत नाही. त्यामुळे या साडीवर तुम्ही पारंपारिक कोल्हापूरी जोडच घालू शकता. त्यामुळे तुमचा लुक एकदम मराठमोळा आणि उठून दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com