Photos: सप्तश्रृंगीगडावर तृतीयपंथियांची छबिना मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्तश्रृंगीगडावर तृतीयपंथियांची छबिना मिरवणूक

सप्तश्रृंगीगड

नाशिक: आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी वणी गडावर कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त राज्यभरातून आलेल्या तृतीयपंथियांनी किन्नरांनी 'आई अंबे' 'सप्तशृंगी मातेचा जयघोष करीत सवाद्य छबिना मिरवणूक काढली. दरम्यान आदिमायेस साडी-चोळीची ओटी भरीत जोगवा गात हजारो भाविकांच्या उपस्थित शेकडो तृतीयपंथियांनी देवी चरणी नतमस्तक झाले.

कोजागिरी पोर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच काल सोमवारी (ता. १८) रोजी सर्वसामान्य भाविकांचे खास आकर्षण असलेल्या तृतीयपंथियांच्या छबिना मिरवणुकीसाठी महामंडलेश्वर पायल नंदगीरी व मुंब येथील भास्कर गुरु हे प्रमुख किन्नर गट सप्तश्रृंगी गडावर दाखल झाले होते. आज सकाळी 11 वाजता महामंडलेश्वर पायल नंदगीरी हे त्यांचे आखाड्यातील  शिवालय तलावर दाखल झाले.

शिवालय तलाव सर्वसामान्य भाविकांना बंद असल्याने फक्त तृतीयपंथियांना पूर्व परवानगीने शिवालय तलावात विधीसाठी सोडण्यात आले होते. शिवालय तलावावर आल्यानंतर किन्नर आपल्या गुरु व गट प्रमुखांचा जयघोष करीत अभिषेक (स्नान) करुन गुरुंना लिंब नेसवून (कडू लिंबाची पानांची डाहाळी डोक्यावर ठेवून) लिंबाची माळ गळयात घालून तलावास प्रदक्षिणा मारली.

लिंब उतरविण्याच्या कार्यक्रमानंतर गुरुंना नववस्त्र व आभुषणे परीधान करुन साजशृंगार केला. यावेळी आपल्या सोबत असलेल्या सप्तश्रृंगी माता, काळु आई, तुळजा भवानी च्या मुर्ती तसेच आपल्या गुरुच्या प्रतिमेचे पुजन करीत छबिना मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

सप्तश्रृंगी माता की जयचा जयघोष डफांच्या निनादात भव्य छबिना जलसा काढण्यात आला. छबिना मिरवणुकीत किन्नरांबरोबरच सर्वसामान्य भाविकही मोठया संख्येने सहभाग घेत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला.

मिरवणुकीची सांगता पहिल्या पायरीवर झाली. दुपारी तीन वाजता भास्कर गुरु यांनीही शिवालय तलावावर जावून परंपरेनुसार पुजा विधी करीत छबिना काढला होता. दरम्यान सांयकाळी सहा वाजता दोन्ही गटांचा मुख्य छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

टॅग्स :WaniNashik
go to top