निवार चक्रीवादळाचा आंध्रलाही फटका

हैदराबाद - बंगालच्या उपसागरात आलेल्या निवार चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या चित्तूर आणि नेल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नदीच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागातील शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंध्रातील एरपेडू, मोदुगुला पाडू, कुम्मारी मिट्टा आणि चेन्नामपल्ली गावे पाण्याखाली गेले आहेत. पापानायडू पेटाजवळील सुवर्णमुखी नदीला पूर आल्याने मद्दीला पालेम आणि गोविंदपूरम गावात पाणी शिरले आहे. तसेच पचिकापलमच्या टीटीडी कल्याण मंडपमजवळ वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे प्रसिद्ध तिरुमला येथेही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दृष्यमानता कमी झाली असून वाहतूकही मंदावली आहे. पावसामुळे तिरुमलाच्या दुसऱ्या घाट रस्त्यावर थांबलेल्या एका बोलेरो वाहनावर मोठा दगड पडला. त्यामुळे वाहनाची हानी झाली. गाडीतील पाच प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले. हे भाविक हैदराबादचे आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com