पेशवे जलाशयाचे सौंदर्य लोप पावतेय!

कात्रज - सुशोभीकरणाने सज्ज असलेल्या नानासाहेब पेशवे जलाशयाला दूषित पाण्याच्या दुर्गंधीने घेरले आहे. मांगडेवाडी व गुजरनिंबाळकरवाडी परिसरातून येणारे ओढे सांडपाणी व मैलापाणी थेट जलाशयात वाहून आणत आहेत. गेली अनेक वर्षे सातत्याने जलाशयात साठणाऱ्या मैलापाण्याने तलावात जलप्रदूषण होऊन जलचर संपुष्टात येत आहेत. सुशोभीकरण झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समाविष्ट असलेला जॉगिंग ट्रॅक व ओपन जीमवर व्यायामाला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कृत्रिम बेट, बेटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, फुलराणी, उंचीवर फडकणारा तिरंगा, म्युझिकल फाउंटन, नाना-नानी उद्यान आणि जलाशयाचे विहंगम नजारा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (छायाचित्रे - सचिन कोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com