क्रिकेटमध्ये सोडलेले कॅच कधी सामने जिंकू शकतो किंवा हारु शकतो. त्यामुळे क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मग तो टी-20 असो किंवा कसोटी सामना झेल खेळाचा निर्णय बदलू शकतात. क्रिकेटच्या इतिहासात आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे झेल सोडणे संघासाठी थोडेसे महागात पडले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात 2014 मध्ये ईडन गार्डन्सवर खेळल्या गेल्या सामन्यात थिसारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडला होता. श्रीलंकासाठी तो कॅच महागडा ठरला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने २६४ धावा करत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केल्या.
किरण मोरे यांनी ग्रॅहम गूच याचा लॉर्ड्सवर 1990 च्या कसोटी सामन्यात कॅच ड्रॉप केले होता.
हर्शेल गिब्सने आयसीसी 1999 च्या विश्वचषकाच्या सुपर-6 सामन्यात स्टीव्ह वॉचा कॅच ड्रॉप केले होता.
2003 विश्वचषक मध्ये पाकिस्तानच्या सामन्यात सचिन 32 धावांवर फलंदाजी करत असताना अब्दुलच्या गोलंदाजीवर कॅच सुटला होता. त्यानंतर सचिनने शानदार ९८ धावा करत भारताला सामना जिंकुन दिला होता.
2015 विश्वचषकमध्ये मार्लन सॅम्युअल्सने मार्टिन गुप्टिलचा कॅच सूडला होता. मार्टिनने नशिबाचा फायदा घेत, बोर्डावर 233 धावा जोडल्या गप्टिलच्या या खेळीमुळे किवीजला १४३ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.