सलून चालवणाऱ्याच्या पोरानं आयपीएलमध्ये काढलं बापाचं नाव

ipl 2022 who is kuldeep sen rr fast bowler father salon sports cricket news aas86
sports cricket news
sports cricket news sakal
Updated on

IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन यांनी पदार्पणाच्या सामन्यातील शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केल्याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. कुलदीपला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मार्कस स्टॉइनिससारख्या दिग्गज खेळाडूसमोर 15 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जी त्याने उत्तम प्रकारे पार पाडली. या 25 वर्षीय गोलंदाजाने शेवटच्या 6 चेंडूत केवळ 11 धावा दिल्या आणि आपल्या संघाला 3 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला.

कुलदीप सेन हा मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावचा आहे. त्याचे वडील रामपाल सेन यांचे शहरातील चौकात छोटेसे हेअर सलूनचे दुकान आहे. रामपाल आणि गीता सेन यांना ५ मुले आहेत.
कुलदीप सेन हा मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावचा आहे. त्याचे वडील रामपाल सेन यांचे शहरातील चौकात छोटेसे हेअर सलूनचे दुकान आहे. रामपाल आणि गीता सेन यांना ५ मुले आहेत.sakal
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने दशकापूर्वी विंध्य क्रिकेट अकादमी क्लबमधून क्रिकेटला सुरुवात केली. या अकादमीने कुलदीपची फी माफ केली आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने दशकापूर्वी विंध्य क्रिकेट अकादमी क्लबमधून क्रिकेटला सुरुवात केली. या अकादमीने कुलदीपची फी माफ केली आहे.sakal
कुलदीप सेनने 2018 मध्ये मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पंजाबविरुद्ध एका डावात 5 विकेट घेतल्या होत्या. कुलदीपने पदार्पणाच्या मोसमात एकूण 25 बळी घेतले.
कुलदीप सेनने 2018 मध्ये मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पंजाबविरुद्ध एका डावात 5 विकेट घेतल्या होत्या. कुलदीपने पदार्पणाच्या मोसमात एकूण 25 बळी घेतले.sakal
कुलदीप आऊटस्विंग गोलंदाजी मस्त करतो. तो फलंदाजीही करू शकतो. लांब षटकार मारण्यात तसेच झटपट फलंदाजी करण्यात पटाईत आहे.
कुलदीप आऊटस्विंग गोलंदाजी मस्त करतो. तो फलंदाजीही करू शकतो. लांब षटकार मारण्यात तसेच झटपट फलंदाजी करण्यात पटाईत आहे.sakal
रीवा जिल्ह्याच्या या आश्वासक गोलंदाजाकडे ताशी 135 ते 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. स्विंग आणि आऊट स्विंग दोन्हीमध्ये त्याने प्रभुत्व मिळवले आहे.
रीवा जिल्ह्याच्या या आश्वासक गोलंदाजाकडे ताशी 135 ते 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. स्विंग आणि आऊट स्विंग दोन्हीमध्ये त्याने प्रभुत्व मिळवले आहे.
कुलदीप सेनने आतापर्यंत रणजी ट्रॉफीच्या 14 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत. प्रशिक्षक एरियल अँथनी 2018 पासून कुलदीपला सतत प्रशिक्षण देत आहेत.
कुलदीप सेनने आतापर्यंत रणजी ट्रॉफीच्या 14 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत. प्रशिक्षक एरियल अँथनी 2018 पासून कुलदीपला सतत प्रशिक्षण देत आहेत.
कुलदीपच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले
कुलदीपच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com