मकर संक्रांतसाठी बाजारपेठ फुलली

मंगळवार, 14 जानेवारी 2020

उस्मानाबाद : भारतीय संस्कृतीतील जवळजवळ सर्वच सण महिलांसाठी पर्वणीच. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हिवाळ्यात येणाऱ्या या सणाला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तर शरीरातील उष्णता कमी होते. तिळ ही स्निग्धता कायम ठेवते; तर गुळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते. सुवासिनी महिलाह्या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांतून एकत्रित येण वाण लुटतात. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता.

उस्मानाबाद : भारतीय संस्कृतीतील जवळजवळ सर्वच सण महिलांसाठी पर्वणीच. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हिवाळ्यात येणाऱ्या या सणाला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तर शरीरातील उष्णता कमी होते. तिळ ही स्निग्धता कायम ठेवते; तर गुळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते. सुवासिनी महिलाह्या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांतून एकत्रित येण वाण लुटतात. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. 14) सायंकाळी उस्मानाबाद शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. माऊली चौक ते नेहरू चौक हा परिसर विविध वस्तूंच्या स्टॉल अन्‌ महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता.