PHOTOS: ओव्या, श्लोक अन् विकास; मोदी तुकोबा चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजेरी लावली.
Narendra modi
Narendra modisakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजेरी लावली. आषाढी वारीसाठी सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी देहूत मोदींच्या हस्ते पार पडलेला लोकार्पणाचा सोहळा विशेष चर्चेत आहे.

या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सोबतच विठ्ठल-रुक्मीनीं यांच्यासमोर ते नतमस्तक झाले. त्यानंतर मोदी यांनी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी वारकऱ्यांची ओळख असणारी विशेष पगडी डोक्यावर घातली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यासाठी बनविण्यात आलेली पगडी राज्यभरात चर्चेचा विषय आहे

यावेळी तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत ज्यांनी देहू संस्थानला भेट दिली. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केले .

 संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे असे ते म्हणाले.

पालखी मार्गासाठी ११ हजार कोटींचा खर्च करणार असल्याचे ते यावेळी संबोधित करताना म्हणाले. यामुळे वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य इतर नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com