यंदा बेळगावात नव्या 50 परदेशी पाहुण्यांचे आगमन; पहा PHOTO

डिसेंबर ते मार्च दरम्यान हे पक्षी बेळगावात वास्तव्यासाठी राहतात.
belgaum
belgaumesakal
Updated on
Summary

बेळगाव शहर व परिसरात यंदा नव्या ५० पक्षांचे आगमन झाले आहे. तसेच दरवर्षी येणारे पक्षीही आहेत. डिसेंबर ते मार्च दरम्यान ते बेळगावात वास्तव्यास राहतात. या दरम्यान त्यांना चांगले खाद्य मिळते. व्हॅक्सीन डेपो, बळ्ळारी नाला व खानापूर परिसरात हे पक्षी वास्तव्य करतात. या पाहुण्यांचे फोटो कॅमेरात कैद केलेत बेळगावचे वन्यजीव छायाचित्रकार आनंद पीपरे यांनी..

दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहर आणि परिसरात सुमारे ५० नव्या परदेशी पाहूण्यांचे आगमन झाले आहे.

बेळगाव शहरातील व्हॅक्सीन डेपो, बळ्ळारी नाला परिसरासह खानापूरातील नदी परिसरात हे पक्षी आढळून येत आहेत.

साधारण मार्चच्या शेवटपर्यंत हे पक्षी या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत. यामुळे नव्या पाहूण्यांचे फोटो टिपण्यास पक्षी प्रेमी सरसावले आहेत.

या नव्या पाहूण्याबरोबर दरवर्षी येणारे जुने पक्षीही यंदा दाखल झाले आहेत. यामुळे पक्षी प्रेमींची भटकंती सुरु झाली आहे.

या पक्षांचे यंदा मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याची माहिती पक्षी प्रेमींनी दिली. स्थलांतर होऊन आलेल्या पक्षांमध्ये लांब पायाच्या पक्षांचा अधिक समावेश आहे.

पक्षी तिबेट, हिमालय परिसर, दक्षिण भारत, समुद्र आवारातील गोवा आदी भागातून बेळगाव परिसरात दाखल झाले आहेत.

बेळगाव परिसरातील नदी व नाला परिसरात डिसेंबर ते मार्च महिन्यात देखील मुबलक पाणी असते.

या काळात पाण्याची पातळी हळूहळू कमी होत राहते. यामुळे या पक्षांना चांगले खाद्य मिळत राहते. या ठिकाणी मासे, किडे व इतर खाद्य मिळते. यामुळे हे पक्षी बेळगावात वास्तव्यास येतात.

सी गल, बार हेडेड गुज, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक हेडेड क्रेन, ब्लॅक स्टॉर्क, स्मॉल प्रॅंन्टिकोल, पिन टेल डक आदी नवे पक्षी खानापूर परिसरात आले आहेत.

आशियाई ओपनबिल स्टॉर्क, ब्लॅक हेडेड ईबीस, स्पुन बिल, रोडीशेल डक, स्ट्रॉबेरी मुनिया, स्कॅली बेस्टेड मुनिया, व्हॉईट डॉटेट मुनिया, स्टील्थ सॅन्ड पायपर, ब्लॅक हेडेड स्पील्ट, ग्रीन बीईटर, ब्राऊन ऊड पिकर, कॉपर स्मीथ बार्बेट, ग्रीन चिक बार्बेट, पिकॉक आदी प्रकारातील पक्षी बेळगावात आढळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com