OTT वर टॉलीवूडचा धूर, बॉलीवूड कोमात! ही आहे नव्या चित्रपटांची यादी |OTT News Tollywood Big Budget movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTT वर टॉलीवूडचा धूर, बॉलीवूड कोमात! ही आहे नव्या चित्रपटांची यादी

Tollywood Movie On Ott News

OTT Movie: ओटीटीवर आता टॉलीवूड चित्रपटांचा बोलबाला दिसून येत आहे. त्यामुळे (Tollywood) बॉलीवूडला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची बॉक्स ऑफिसवरील कमाई कमी झाली आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा टॉलीवूडच्या (Bollywood News) चित्रपटांचा आहे. प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे आता बिग बजेट (OTT Movies News) दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर येणार आहेत. त्यामध्ये चिरंजीवी, आरआरआर, बिस्ट आणि आचार्य या चित्रपटांचा मोठा वाटा आहे. बिस्ट हा चित्रपट येत्या अकरा मे ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये थलापती विजयचा मोठा वाटा आहे. बॉलीवूडचा बॉक्सवरील कमाईचा टक्का कमी करण्यात टॉलीवूडच्या चित्रपटांनी बाजी मारली आहे. हटके विषय, दमदार अभिनय, अॅक्शन सीन, प्रभावी दिग्दर्शन यामुळे बॉलीवूडकडे प्रेक्षकांचा कल कमी झाला आहे.

 एस एस राजामौली (RRR Movie) यांचा आरआरआर हा यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यानं बाहुबलीच रेकॉर्ड ब्रेक केले आहे.  पाच भाषेत झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्वर प्रदर्शित होणार आहे. 20 मे 2022 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते.

 बिस्ट (Beast) हा थलापती  विजयचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. मात्र त्याला केजीएफचं तगडं आव्हान होते. त्यामुळे त्याचा निभाव फारसा लागला नाही. आता ११ मे ला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येतो आहे. या चित्रपटामध्ये पुजा हेगडे, विजय मुख्य भूमिकेत आहे.

 चिरंचीवी आणि राम चरण यांचा आचार्य (Acharya) नावाचा चित्रपट नेटकऱ्यांना ओटीटीवर पाहता येणार आहे. तो 27 मे रोजी अॅंमेझॉन प्राईमवर येणार आहे. बिग बजेट असणाऱ्या आचार्यला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तो ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

go to top