
Jhund OTT: झुंडच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
Bollywood movie: प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) दिग्दर्शित झुंड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटातून महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंडची निर्मिती करणाऱ्या नागराज (bollywood Movie) मंजुळेच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. मात्र तो ओटीटीवर प्रदर्शित होण्यापूर्वी कायद्याच्या कचाट्याच सापडला होता. झुंडच्या विरोधात तेलंगाणा कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्या याचिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानं ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
झुंडच्या निर्मात्यांनी कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे तो चित्रपट ओटीटीवर येण्यास काही अडचणी होत्या. तेलंगाणा कोर्टानं सहा मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला होता. त्यानंतर 9 जुनपर्यत हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला 9 जुनपर्यत स्थगिती देण्याचा निर्णय देण्यात आला होता. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, निर्मात्यांवर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हायकोर्टानं हा चित्रपट 6 मे पर्यत ओटीटीवर प्रदर्शित करु नका असे सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या चित्रपटाच्या ओटीटी हक्कांविषयी आणि प्रदर्शित करण्यासंबंधी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: Jhund: 6 मे रोजी 'झुंड' OTT वर नाहीच? सुप्रीम कोर्टात ठरणार भवितव्य
Web Title: Jhund Movie Supreme Court Ready To Hear Plea Ott Released Nagraj Manjule Amitbh Bachchan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..