PHOTO : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

Tuesday, 1 December 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळ आठपासून मतदानाला सुरवात झाली आहे. दुपारी एक वाजत परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदान केले. औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी आजारी असतानाही मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी मतदाने केले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळ आठपासून मतदानाला सुरवात झाली आहे. दुपारी एक वाजत परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदान केले. औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी आजारी असतानाही मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी मतदाने केले. तत्पूर्वी मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्नीसह औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. परळीत खासदार प्रीतम मुंडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

 

संपादन - गणेश पिटेकर