Photos : PM मोदींनी फ्रान्सच्या अध्यक्षांना मारली मिठी; जागतिक समस्यांवर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos : PM मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांना मिठी; जागतिक समस्यांवर चर्चा

PM Modi France Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचे काही क्षणचित्र...

तीन देशांच्या युरोपीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात डेन्मार्कहून आलेले पंतप्रधान मोदी यांचे पॅरिसमधील एलिसी पॅलेसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी जोरदार स्वागत केले.

माझे मित्र इम्यॅनुअल मॅक्रॉन यांना भेटून आनंद झाला असून आम्ही द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली, असं मोदींनी म्हटलं.

भारत आणि फ्रान्सची भागीदारी ही अभिमानास्पद असून अनेक क्षेत्रात आमची भागीदारी आहे, असं ट्विट करत मोदींनी मॅक्रॉन यांना मिठी मारतानाचा फोटो शेअर केला.

दोन्ही देशांची शांतता, विकास आणि समद्धीसाठी भागीदारी झाली असून धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनीही सांगितलं.

पंतप्रधान मोदींचा एकूण तीन दिवसांचा दौरा होता. यावेळी मोदींनी चार देशांना भेट दिली असून ते भारतात परतले आहेत.

go to top