PHOTO :PHOTO : 'प्रवाह पिक्चर'च्या लॉन्चिंगला स्टायलिश लूक मध्ये दिसले हे कलाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : 'प्रवाह पिक्चर'च्या लॉन्चिंगला स्टायलिश लूक मध्ये दिसले हे कलाकार

pravah picture new channel launched for marathi movie

PRAVAH PICTURE : संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी डिस्ने ने 'प्रवाह पिक्चर' ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. या वाहिनीचा लाँचींग सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार अत्यंत स्टाईलिश लुक मध्ये उपस्थित होते, त्यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. ही वाहिनी सध्या सुरु झाली असून प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.

या लाँचप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतले सर्व दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने महेश कोठारे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी एकत्र बघायला मिळाली.

दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे. मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री अमृता खानविलकरही उपस्थित होती.

प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना 'पावनखिंड' या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु झाला. याशिवाय हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा', ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'कधी आंबट कधी गोड' आणि 'प्रवास',  स्वप्नील जोशीचा 'बळी', महेश मांजरेकर यांचा 'ध्यानीमनी', 'कारखानीसांची वारी'; असे अनेक दर्जेदार चित्रपट या वाहिनीद्वारे भेटीला येणार आहे.  दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जोशी, उमेश कामात आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा हा खास फोटो.

अभिनेत्री अलका कुबल तरुण अभिनेत्री तेजस्विनी यांच्या भेटीचा अनोखा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे, स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे, अभिनेता अंकुश चौधरी, संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार गुरु ठाकूर एकाच मंचावर..

अभिनेता सुशांत शेलार, सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे, सुयश टिळक आणि पत्नी आयुषी भावे हे देखील यावेळी हजर होते.

मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवलेले महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ यांनीही आपल्या आठवणींना या सोहळ्यात उजाळा दिल.

अभिनेता सचित पाटील, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची ही खास पोज.

go to top