Image Story: गाणे एक किस्से अनेक! लतादीदींच्या या गीतामागे घडल्या अनेक गोष्टी | Lata Mangeshkar's Ae Mere Vatan ke Logo Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाणे एक किस्से अनेक! लतादीदींच्या या गीतामागे घडल्या अनेक गोष्टी

Behinde the scenes of Ae Mere Vatan ke logo song

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झालं. लतादीदींनी आपल्या कारकीर्दीत अनेक अजरामर गाणी गायली. परंतू त्यांच्या ज्या गाण्यानं सबंध भारतीयांच्या हृदयात घर केलं ते गाणं म्हणजे 'ऐ मेरे वतन के लोगो' (Ae Mere Vatan ke Logo) हे होय. देशातील सर्वकालीन सर्वोत्तम देशभक्तीपर गीतांमध्ये या गीताचा (Song) वरचा नंबर लागतो. लतादीदींनी गायलेल्या या गीताने दशकानुदशके भारतीयांच्या मनात देशभक्तीची मशाल पेटवली. हे गीत फक्त गीत नव्हते, हा एक इतिहास (History) होता. हे गाणं तयार होताना अनेक गोष्टी घडल्या. अनेक अडथळे पार करत हे गाणे पूर्ण झाले. या गाण्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण घटनांचा आपण आढावा घेणार आहोत. (Review of important events related to Lata Mangeshkar's 'Ae Mere Watan Ke logo' song)

1. ऐ मेरे वतन के लोगो- ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत माहिती नाही असा एकही व्यक्ती भारतात नसेल. कवी प्रदीप (Pradeep) यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र (C.Ramchandra) यांनी संगीतबद्ध केलेले हे एक सुप्रसिद्ध हिंदी देशभक्तीपर गीत आहे. हे गीत 1962 च्या चिनी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना (Soldiers) समर्पित करण्यात आले होते. हे गाणं ऐकून इतर लोकांप्रमाणे पंतप्रधान नेहरूसुद्धा स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू रोखू शकले नाहीत.

2. सिगारेट बॉक्सच्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर लिहिलं होतं गाणं- ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याबाबत कवी प्रदीप यांनी एक किस्सा सांगितला होता. मुंबईच्या माहीम बीचवर फिरत असताना त्यांना या गीताच्या ओळी सुचल्या. त्यावेळी त्यांच्याकडे ना पेन होता ना कागद. त्यांनी जवळून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडून पेन घेतला आणि मग सिगारेटच्या पेटीच्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर या गाण्याच्या काही ओळी लिहिल्या.

3. लतादीदींनी दिला होता नकार- लतादीदींनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याने समस्त भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेतला. परंतु हे गाणे गाण्यास त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. त्यानंतर आशा भोसले यांच्या नावाचा विचार झाला. परंतु या गाण्याला लतादीदीच न्याय देऊ शकतील, असं कवी प्रदीप यांचे ठाम मत होते. त्यामुळेच त्यांनी लतादीदींच मन वळवले आणि त्यातून एका अतुलनीय कलाकृतीचा जन्म झाला.

4. हे गाणं पहिल्यांदा ऐकून लतादीदीही रडल्या- हे गाणे कवी प्रदीप यांनी लतादीदींसमोर पहिल्यांदा गायले तेव्हा लतादीदींना रडू कोसळल्याचं सांगितले जाते. त्यांनी गाण्यासाठी लगेचच होकार दिला. त्यानंतर त्यांनी एकच अट घातली की, जेव्हा या गाण्याची रिहर्सल होईल तेव्हा प्रदीप यांना स्वतः हजर राहावं लागेल. प्रदीप यांनीही ते मान्य केलं.

5. लता-आशा ड्युएट गाणार होत्या- हे गाणे ऐकल्यानंतर हे गीत सोलोऐवजी ड्युएट गायला हवे, असा सल्ला लतादीदींनी दिला होता. त्यातही आशा भोसले त्यांच्यासोबत असाव्या अशा त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे या गाण्याची तालीम लता आणि आशा यांनी ड्युएटमध्ये केली होती. परंतु हे गीत लतादीदींनी एकटीने गावं, अशी प्रदीप यांची इच्छा होती. परंतु नंतर आशा भोसलेंनी स्वतःला या गीतापासून दूर केलं. त्यानंतर लतादीदींनी ते दिल्लीत एकटीने गायले.

6. 27 जानेवारी 1963 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशभरातील अनेक लोक दिल्लीतील नॅशनल स्टेडीयमवर एकत्र जमले होते. चीनसोबतच्या युद्धाच्या कटू आठवणी देश अजून विसरला नव्हता. अशातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या राहिल्या आणि चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी 'ऐ मेरे वतन के लोगो' गीत गायलं. हे गीत ऐकून तिथं उपस्थित लोकांच्या डोळ्यांतून आपसूकच अश्रू अनावर झाले. स्वतः पंडित नेहरूसुद्धा अश्रू रोखू शकले नाहीत.

7. यंदापासून प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीट कार्यक्रमामध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताचा समावेश करण्यात आला.

जेव्हा जेव्हा 'ऐ मेरे वतन के लोगो' गाणे लागेल तेव्हा तेव्हा लतादीदींची आठवण नक्की येईल.

go to top