रोल्स रॉइसची कर्मचारी कपात; किती ते वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
Friday, 22 May 2020

ब्रिटीश सरकारची कर्मचाऱ्यांना मदत
युरोपात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ब्रिटन सरकारने नोकरी गमवणाऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली असून याचा रोल्स रॉईसमधील किमान चार हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

रोल्स  रॉईसचा शेअर घसरला
ब्रिटनच्या शेअर बाजारात रोल्स रॉइसचा शेअर २ टक्क्यांनी घसरला. चालू वर्षात रोल्स रॉइसच्या शेअरमध्ये सुमारे ६२ टक्के घसरण झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगभरात ठप्प झालेल्या व्यवहारांची झळ आता मोठ्या कंपन्यांना बसू लागली आहे. विमानांचे इंजिन तयार करणाऱ्या ब्रिटनमधील रोल्स रॉइस या कंपनीने नऊ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. नऊ हजार कर्मचारी  कमी केल्यामुळे ७० कोटी पाउंडची बचत होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कारण सांगत कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. युरोपामधील देशांना आता मंदीची झळ बसू लागली आहे. युरोपातील आतापर्यंतची मोठी नोकरकपात मानली जात आहे. 

सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण

कोरोनाचा सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. जगभरातील विमान वाहतूक बंद असल्याने आधीपासूनच संकटात असलेल्या जगभरातील विमान कंपन्या आता दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. विमान वाहतूक बंद असल्याने विमानांचे इंजिन आणि इतर सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या अडचणीचा सामना करत आहेत. 

रोल्स रॉइस ही ''बोइंग-७८७'' आणि ''एअरबस-३५०'' विमानांचे इंजिन तयार करते. मात्र मागणी घटल्याने कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात जाहीर केली आहे. 

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुधारणा

रोल्स रॉइसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन इस्ट म्हणाले, ''कंपनी प्रकल्पाची क्षमता कमी करण्याच्या विचारात आहे. विमान सेवा बंद असल्याने हवाई सेवा क्षेत्राशी निगडित सर्वच उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.''

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

''रोल्स रॉइस''चे जगभरात ५२ हजार कर्मचारी आहेत. कंपनीचे जर्मनी , सिंगापूरसह इतर काही देशात प्रकल्प आहेत.  कंपनीची वार्षिक उलाढाल १५ अब्ज पाउंड आहे. कंपनीचा दरवर्षी किमान १.३ अब्ज पौंडची बचत करण्याचा मानस आहे. आहे. 

वर्ष १९८७ मध्ये कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर ही दुर्दैवाने मोठी नोकर कपात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rolls Royce staff cuts