sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp च्या 'व्हॉइस मेसेज'चा नवा फंडा

WhatsApp

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपले व्हॉइस मेसेज फीचर आणखीन अपडेट करणार आहे. एकदा नवीन फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस मेसेज पाठवणाऱ्यांसाठी ते अधिक सोपे होईल. आतापर्यंत तुम्ही जास्त वेळ बोलण्यासाठी खूप व्हॉइस नोट्स पाठवत असाल, तसेच नवीन फीचर आल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण गोष्ट फक्त एका व्हॉईस मेसेजमध्ये सांगू शकाल.

वास्तविक, कंपनी आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग पॉज करण्याची (थांबवण्याची) सुविधा जोडणार आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, कंपनी एका नवीन फिचरवर काम करत आहे. या अंतर्गत, युजर्स ऑडिओ मेसज रेकॉर्ड करताना पॉज आणि पुन्हा रेकॉर्ड करू शकतील.

सध्या, जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टला व्हॉईस मेसेज पाठवायचा असेल तर तुम्हाला न थांबता संपूर्ण रेकॉर्डिंग करावे लागेल. सध्या रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी कोणतेही फीचर नाही.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉइस मेसेज फीचरमध्ये स्पीड कंट्रोल जोडले होते. नवीन फिचरद्वारे, आपण व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले व्हॉइस मेसेज तीन वेगवेगळ्या पध्दतीने ऐकू शकता.

युजर्संना 1x, 1.5x आणि 2x (म्हणजे नॉर्मल, 1.5x वेगवान आणि 2x वेगवान) स्पीडचे पर्याय मिळू लागले आहेत. पूर्वी तुम्ही फक्त नार्मल स्पीडने व्हॉइस मेसेज ऐकू शकत होता. अशा परिस्थितीत, एक मोठी व्हॉईस नोट ऐकायला जास्त वेळ लागतो.

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप नवीन मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवरही काम करत आहे. सुरवातीला फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर देखील या प्रकारचे फीचर पाहिले आहे.

आता ते व्हॉट्सअ‍ॅपवरही येणार आहे. याद्वारे, आपण आपल्या आवडीच्या इमोजीद्वारे चॅटमध्ये येणाऱ्या मेसेजवर प्रतिक्रिया (रिअ‍ॅक्शन) देऊ शकाल. हे सुविधा ग्रुप चॅट करण्यासाठी देखील उपलब्ध असेल.

टॅग्स :whatsapp