टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेतील कलावंतांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. (Tv Entertainment) केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये या मालिकेनं आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. आता तारक मेहता मालिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या मिस्टर बाबुलाल उर्फ राकेश बेदी यांच्या मुलीचा (tarak mehta ka oolta chashma) रिद्धीमा बेदीचा विवाहसोहळा पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तारक मेहताची टीम राकेश बेदी यांच्या मुलीच्या लग्नाला पोहचली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मुख्य अभिनेते दिलीप जोशी उर्फ जेठालाल दिसत आहे. राकेश बेदी यांनी तारक मेहतातून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
राकेश बेदी यांची मुलगी रिद्धीमा ही देखील मनोरंजन विश्वाशी संबंधित आहे. सोशल मीडियावर तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. आपल्या अदाकारीनं तिनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. ती आता स्क्री अप्स सीझन दोनमध्ये दिसणार आहे.
त्या लग्नाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तारक मेहताचे प्रोड्युसर असित कुमार मोदी देखील दिसत आहे. राकेश बेदी यांनी पिंक शर्ट आणि सुट पँट परिधान केल्याचे दिसत आहे. त्या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटसही दिल्या आहेत.
एका चाहत्यानं दिलेली कमेंटही व्हायरल झाली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, जर तुमच्या लक्षात असेल तर आपण सर्वजण हम सब एक है या मालिकेतून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला होतात. आणि त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सोशल मीडियावर विरल भयानीनं त्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.