PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव.. |virajas kulkarni and shivani rangole mehendi ceremony | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

Virajas kulkarni and shivani rangole wedding

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीत देखील असे काही कपल आहेत ते लवकरच लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक कपल म्हणजे विराजस कुलकर्णी (virajas kulkarni ) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) आहे. येत्या ७ मे रोजी ते विवाह बंधनात अडकणार असून (Virajas Kulkarni-Shivani Rangole Wedding) लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा मेहंदीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही खास फोटो..

या सोहळ्यासाठी शिवानीने खास  हिरव्या रंगाचा काठपदराच्या साडीचा ड्रेस  तयार केला आहे. शिवाय त्याला शोभतील असे फुलांचे दागिने देखील घातले आहे.

'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक  दिग्दर्शकही आहे.

'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 'सांग तू आहेस ना' आणि  ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.

अलिकडेच शिवानी आणि विराजसने एका जाहिरातीसाठी लग्नाचा सीन शूट केला होता. तेव्हा त्यांनी गुपचूप लग्न केलं,अशा चर्चांना खुप उधाण आलं होतं. पण त्यांचा खरा विवाह  येत्या ७ मे रोजी पुण्यात होणार आहे.

विराजस आणि शिवानी बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत.  काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन प्रपोस केलं होतं. त्यासाठी त्याने एक खास सरप्राईस प्लॅन केला होता.

go to top