सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीत देखील नुकतेच एक कपल विवाह बंधनात अडकले. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे याचा विवाहाची चर्च गेली काही दिवस सुरु होती. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. (Virajs Kulkarni and Shivani Rangole Wedding) त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो...
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांनाही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाची माहिती दिली. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी 'Finally!' असे कॅप्शन त्याला दिले आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्यातील अंतरपाट दूर होऊन ते विवाहबंधनात अडकले.
अत्यंत पारंपारिक पद्धतीने पुण्यामध्ये हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी घरातील सदस्य आणि काही मोजके कलाकार उपस्थित होते. सोशल मिडीयावर मात्र चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विराजस आणि शिवानी बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन प्रपोस केलं होतं. त्यासाठी त्याने एक खास सरप्राईस प्लॅन केला होता.
'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. 'सांग तू आहेस ना' आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.
'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक दिग्दर्शकही आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.