महिलांनो, आहारात करा पाच फळांचा समावेश! तब्येत राहील फिट| Womens Diet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनो, आहारात करा पाच फळांचा समावेश! तब्येत राहील फिट

Women fruit Diet

Women's Health: महिला घर, ऑफिस अशा दोन्ही आघाड्यांवर लढत असतात. कुठेनाकुठे त्यांना मानसिक ताण येतोच. या ताणाचा शरीरावर परिणाम दिसायला लागतो. मासिक पाळी अनियमित येणे, गर्भधारणेदरम्यान समस्या, हार्मोनल समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी आहार चांगला घेणे गरजेचे आहे. यासाठी फळे खाल्ल्याने त्यांना फायदा होऊ शकतो. महिलांनी ही फळे नियमित खाल्ल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहू शकते.

१) डाळींब- डाळींब सर्वांसाठी फायदेशीर आहे. पण महिलांसाठी ते जास्त लाभदायक मानले जाते. रजोनिवृत्तीच्या दरम्यान डाळींब खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. डाळींबात असलेल्या अँटीऑक्सिडंटचे अनेक फायदे आहेत.

२) चेरी- उर्जा कमी प्रमाणात असल्याने महिलांमध्ये चिंता वाढते. चेरी उर्जा वाढविण्यासाठी मदत करू शकते. चेरीमुळे अनेक आरोग्य समस्या कमी होता. चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट अँथोसायनिन्स मुबलक प्रमाणात असल्याने हे घटक ऊर्जा वाढवतात.

३) व्हिटॅमिन सीयुक्त फळे -संत्री, लिंबू आणि द्राक्ष व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात. ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. तसेच इतर आंबट फळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्हाला हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी मदत मिळते. आंबट फळांमध्ये हेस्पेरिडिन असते असे मानले जाते. ते उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची लक्षणे कमी करू शकते.

४) सफरचंद-  महिला, पुरूष, लहान मुलांच्या आरोग्यासाठी सफरचंद फायद्याचे मानले जाते. पण फक्त महिलांबाबत बोलायचे झाल्यास, वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य आणि मधुमेहावर नियंत्रण मिळण्यासाठी सफरचंदाची मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये झालेल्या एका अभ्यानुसार, ज्या महिला नियमित सफरचंद खाता त्यांच्यात कोरोनरी रोगाचा धोका १३ ते २२ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

५) आवळा- महिलांनी आर्यनच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये आर्यनची कमतरता असण्याचे सामान्य कारण म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान लोहाची कमतरता. त्यामुळेच त्यांना आहारात आवळ्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

go to top