Year Ender 2022: या वर्षी जगभरात घडलेल्या मोठ्या घटना; जाणून घ्या

Year Ender 2022
Year Ender 2022esakal
Updated on
२४ फेब्रुवारी २०२२, रशिया-युक्रेन युद्ध :
रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटले. ३०० दिवसांनंतरही ते सुरूच आहे. यात शेकडो जण ठार झाले. युद्ध दोन देशांत होत असले तरी संपूर्ण जगाला त्याची झळ बसली. विशेषतः भारतावर याचा परिणाम झाला. दोन्ही देशांत वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी मायदेशी परतले व त्यांचे भवितव्य अधांतरी झाले. भारत सामरिक उपकरण पुरवठ्याच्या बाबतीत ६० ते ७० टक्के रशियावर अवलंबून आहे. या युद्धामुळे शस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये अडथळा निर्माण होईल, असे भारताला वाटते.
२४ फेब्रुवारी २०२२, रशिया-युक्रेन युद्ध : रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटले. ३०० दिवसांनंतरही ते सुरूच आहे. यात शेकडो जण ठार झाले. युद्ध दोन देशांत होत असले तरी संपूर्ण जगाला त्याची झळ बसली. विशेषतः भारतावर याचा परिणाम झाला. दोन्ही देशांत वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी मायदेशी परतले व त्यांचे भवितव्य अधांतरी झाले. भारत सामरिक उपकरण पुरवठ्याच्या बाबतीत ६० ते ७० टक्के रशियावर अवलंबून आहे. या युद्धामुळे शस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये अडथळा निर्माण होईल, असे भारताला वाटते.esakal
जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे ;

भारताकडे यंदा जी २० गटाचे अध्यक्षपद आले. विकसनशील देशांच्या समस्यांबाबत भूमिका मांडण्याची जबाबदारी यानिमित्ताने भारताकडे आली आहे. रशिया- युक्रेन संघर्ष आणि आर्थिक मंदीपासून ते विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या समस्या असे अनेक प्रश्न आहेत. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारत जी २० संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीमध्ये होणाच्या अंतिम शिखर परिषदेत ४३ राष्ट्रप्रमुखांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे.
जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे ; भारताकडे यंदा जी २० गटाचे अध्यक्षपद आले. विकसनशील देशांच्या समस्यांबाबत भूमिका मांडण्याची जबाबदारी यानिमित्ताने भारताकडे आली आहे. रशिया- युक्रेन संघर्ष आणि आर्थिक मंदीपासून ते विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या समस्या असे अनेक प्रश्न आहेत. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारत जी २० संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीमध्ये होणाच्या अंतिम शिखर परिषदेत ४३ राष्ट्रप्रमुखांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे.esaka
भारतात दिवाळीचा आनंद या वर्षी नेहमीपेक्षा अधिक होता. ज्या इंग्रजांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले, त्यांचे नेतृत्व ऋषी सुनक यांच्या रूपाने भारतीयांकडे आले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुतक यांची निवड झाली. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच एका कृष्णवर्णीयाची या पदावर नियुक्ती झाली. सुनक यांचे आजी-आजोबा पंजाबमधील असून, त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.
भारतात दिवाळीचा आनंद या वर्षी नेहमीपेक्षा अधिक होता. ज्या इंग्रजांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले, त्यांचे नेतृत्व ऋषी सुनक यांच्या रूपाने भारतीयांकडे आले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुतक यांची निवड झाली. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच एका कृष्णवर्णीयाची या पदावर नियुक्ती झाली. सुनक यांचे आजी-आजोबा पंजाबमधील असून, त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.esaka
महाराणींचे निधन, चार्ल्स यांना राजगादी :

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे सप्टेंबरमध्ये वृद्धापकाळाने वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले, त्या ब्रिटिश राजघराण्याच्या सिहासनावर सात दशके विराजमान होत्या. १९५२ साली वयाच्या २५व्या वर्षी त्या ब्रिटनच्या महाराणी झाल्या होत्या. विस्टन चर्चील ते लिस ट्रस असे १५ पंतप्रधान एलिझाबेथ यांनी पाहिले. कमालीचा मृदुपणा व अंगभूत क्षमाशीलता याच्या जोरावर राणी एलिझाबेथ यांनी लोकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला अमाप जनसागर उसळला होता. महाराणींच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनवण्यात आले.
महाराणींचे निधन, चार्ल्स यांना राजगादी : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे सप्टेंबरमध्ये वृद्धापकाळाने वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले, त्या ब्रिटिश राजघराण्याच्या सिहासनावर सात दशके विराजमान होत्या. १९५२ साली वयाच्या २५व्या वर्षी त्या ब्रिटनच्या महाराणी झाल्या होत्या. विस्टन चर्चील ते लिस ट्रस असे १५ पंतप्रधान एलिझाबेथ यांनी पाहिले. कमालीचा मृदुपणा व अंगभूत क्षमाशीलता याच्या जोरावर राणी एलिझाबेथ यांनी लोकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला अमाप जनसागर उसळला होता. महाराणींच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनवण्यात आले.esaka
श्रीलंकेत जनतेचा उद्रेक : 

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सामान्य नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. राष्ट्रपती भवनावर नागरिकांनी हल्ला केल्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांच्यावर पळून जाण्याची वेळ आली. लोकप्रतिनिधींच्या घरावरही हल्ले झाले. जनता रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने अनेक वेळा संचारबंदी लागू केली होती. मिरची ७१० रुपये किलो, बटाटे २०० रुपये, तर कोबीचा भाव २४० रुपये किलोपर्यंत गेला होता. त्यातून जनता संतप्त झाली व सरकार उलथवले.
श्रीलंकेत जनतेचा उद्रेक : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सामान्य नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. राष्ट्रपती भवनावर नागरिकांनी हल्ला केल्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांच्यावर पळून जाण्याची वेळ आली. लोकप्रतिनिधींच्या घरावरही हल्ले झाले. जनता रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने अनेक वेळा संचारबंदी लागू केली होती. मिरची ७१० रुपये किलो, बटाटे २०० रुपये, तर कोबीचा भाव २४० रुपये किलोपर्यंत गेला होता. त्यातून जनता संतप्त झाली व सरकार उलथवले.esaka
आबे यांची हत्या, ८ जुलै २०२२ : 

रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (६७) यांची निवडणूक प्रचारादरम्यान हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. नारा शहरात सकाळी साडेअकरा वाजता प्रचारानिमित्त आबे बोलू लागताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी आणि दुसरी छातीत लागली. शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या ४१ वर्षीय आरोपी तेत्सुया यामागामीला पोलिसांनी तत्काळ अटक केली.
आबे यांची हत्या, ८ जुलै २०२२ : रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (६७) यांची निवडणूक प्रचारादरम्यान हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. नारा शहरात सकाळी साडेअकरा वाजता प्रचारानिमित्त आबे बोलू लागताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी आणि दुसरी छातीत लागली. शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या ४१ वर्षीय आरोपी तेत्सुया यामागामीला पोलिसांनी तत्काळ अटक केली.esaka
मंकी पॉक्सने हाहाकार :

कोरोना विषाणूप्रमाणे मंकीपॉक्सने २०२२ मध्ये जगभरात हाहाकार माजवला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जुलै महिन्यात सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली होती. पश्चिम आणि मध्य अफ्रिकेत या विषाणूचा उद्भव झाला. युरोपमध्ये यामुळे सर्वांत गंभीर स्थिती होती. हा विषाणू माकडांपासून मानवांमध्ये पसरतो, याला मंकी फिव्हर असेही म्हणतात.
मंकी पॉक्सने हाहाकार : कोरोना विषाणूप्रमाणे मंकीपॉक्सने २०२२ मध्ये जगभरात हाहाकार माजवला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जुलै महिन्यात सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली होती. पश्चिम आणि मध्य अफ्रिकेत या विषाणूचा उद्भव झाला. युरोपमध्ये यामुळे सर्वांत गंभीर स्थिती होती. हा विषाणू माकडांपासून मानवांमध्ये पसरतो, याला मंकी फिव्हर असेही म्हणतात.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com