जळगाव : निलगायच्या धडकेत रिक्षा उलटून 1 ठार, 4 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Accident News

जळगाव : निलगायच्या धडकेत रिक्षा उलटून 1 ठार, 4 जखमी

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या रिक्षाला (Rikshaw) दूरदर्शन टॉवरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या निलगायने जोरदार धडक (Collision) दिली. अपघातात (Accident) भरधाव रिक्षा उलटून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (medical College) दाखल करण्यात आले आहे. साबीर सत्तार बागवान (वय ४० रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (1 killed 4 injured in rickshaw accident in Nilgai collision Jalgaon acciddent News)

हेही वाचा: Jalgaon : जिल्ह्यात कोरोनाचे 16 सक्रिय रुग्ण

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे येणारी रिक्षा (एमएच १९ व्ही ९५२१) येत होती. निलगाय रस्ता ओलांडत असताना ती सुसाट रिक्षावर आदळली. रिक्षात बसलेल्या शाबीर सत्तार बागवान यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक मोहम्मद आलम मोहम्मद जान (वय ४८, रा. भुसावळ), बबता कन्हैय्याल बडगुजर (वय ४५, रा. पिंपळगाव, ता. एरंडोल), नसरीनबी चांद बागवान (वय ५५, रा. धुळे) आणि साहिल मकबल बागवान (वय १३, रा. तांबापूरा) असे चौघं गंभीर जखमी झाले आहे.

हेही वाचा: चोरीच्या वाहनांची कवडीमोल विक्री; टोळीतील तिघांना अटक

Web Title: 1 Killed 4 Injured In Rickshaw Accident In Nilgai Collision Jalgaon Acciddent News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top