नांदगाव येथे सर्पदंशाने 11 वर्षीय बालिकेचा मृत्यू | Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death Girl due to sneak bite

नांदगाव येथे सर्पदंशाने 11 वर्षीय बालिकेचा मृत्यू

बोदवड (जि. जळगाव) : तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (ता. २६) रात्री सर्पदंश होऊन अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. मजली विनोद पारधी (वय ११) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. (11 year old girl death due to snake bite in Nandgaon jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon : रोटाव्हेटरमध्ये जखमी शेतमजुराचा मृत्यू

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी घरात सर्व झोपलेले असताना मजली हिस सर्पदंश झाला. तस तिने वडीलांना आपल्याला सर्पदंश झाल्याचे सांगितले. परंतु मुलगी लहान असल्याने घरातील मंडळींनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. परंतु सकाळी उठताच क्षणी घरातच साप दिसल्याने वडिलांनी सापाला मारले. मुलीला पाहिले असता, ती अंथरुणात मयत स्थितीमध्ये आढळून आली. घरच्यांनी मुलीला लागलीच ग्रामीण रूग्णालय, बोदवड येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नीलेश कडू पारधी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेडकांस्टेबल सचिन चौधरी करीत आहे.

हेही वाचा: हनुमंतखेडा येथे वीज पडून तरुण ठार

Web Title: 11 Year Old Girl Death Due To Snake Bite In Nandgaon Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonsnakeDeath girl