Jalgaon News : 14 पालिकांना ‘ओडीएफ प्लस प्लस’ दर्जा; ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त कामगिरी सुधारली

स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ‘ओडीएफ प्लस प्लस’ चा दर्जा मिळाला आहे. ओडीएफ म्हणजे उघड्यावरील शौचापासून मुक्त शहर.
14 Municipalities in district got status of ODF Plus Plus in the Swachh Survey jalgaon news
14 Municipalities in district got status of ODF Plus Plus in the Swachh Survey jalgaon newsesakal

Jalgaon News : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुधारणा झाली आहे. (14 Municipalities in district got status of ODF Plus Plus in the Swachh Survey jalgaon news)

स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ‘ओडीएफ प्लस प्लस’ चा दर्जा मिळाला आहे. ओडीएफ म्हणजे उघड्यावरील शौचापासून मुक्त शहर.

तर ओडीएफ प्लस हा र्दजा उघड्यावरील शौचालयापासून मुक्तीनंतर संबधित शहरात आरोग्य विभागाच्या मानांकनानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहदेखील उपलब्ध आहेत.

उघड्यावरील शौचमुक्त शहरांत स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहाशिवाय मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित असून सांडपाण्यावर नियमित प्रक्रिया केली जाते. अशा शहरांना तर ओडीएफ प्लस प्लस प्रकारच्या श्रेणीत समावेश केला जातो.

या पालिकांचा समावेश

जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा, सावदा, यावल, पारोळा, रावेर व वरणगाव या नगरपालिकांना ओडईएफ प्लस प्लसचा दर्जा मिळाला आहे.‌अशी माहिती सहायक आयुक्त (नगरपालिका)‌ जनार्दन पवार यांनी दिली.

14 Municipalities in district got status of ODF Plus Plus in the Swachh Survey jalgaon news
Jalgaon News : HIV सह जगणाऱ्यांना त्वरित रेशन कार्ड द्या; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नगरपालिकांत पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे‌.नागरिकांनी ही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवावा‌.

असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नगरपालिकांमध्ये झालेल्या सुधारणांसाठी नागरिक, सफाई कामगार व मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन ही त्यांनी केले आहे‌.

"‘स्वच्छता सर्वेक्षण कामगिरीत सुधारणा झाली आहे. पुढील वर्षी नगरपालिकांच्या कामगिरीत अजून सुधारणा होण्यासाठी निकालाचे नगरपालिकानिहाय विश्लेषण केले जाईल. यानुसार सखोल नियोजन आराखडा तयार करून आवश्यक निधी व मनुष्यबळ प्रत्येक नगरपालिकेला उपलब्ध करून दिले जाई‌ल. एक वर्ष प्रचंड मेहनत घेऊन पुढील वर्षी चांगला निकाल लागेल, ‌यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत." - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

14 Municipalities in district got status of ODF Plus Plus in the Swachh Survey jalgaon news
Jalgaon Municipality News : महापालिकेच्या दणक्यानंतर रस्ता झाला मोकळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com