Latest Jalgaon News | सुरत, नाशिकमधून चोरलेल्या 15 दुचाकी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superintendent of Police Dr. Praveen Mundhe with seized bikes

Jalgaon Crime : सुरत, नाशिकमधून चोरलेल्या 15 दुचाकी जप्त

जळगाव : चोरट्याने शहर पोलिसांना १५ मोटारसायकली काढून दिल्या आहेत. रोहित तुळशीराम कोळी असे संशयिताचे नाव असून तीनच दिवसात शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने चोपडा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या चोरट्यांकडून शहर पोलिसांनी तब्बल २६ चोरीची वाहने जप्त केली आहे. (15 bikes stolen from Surat Nashik seized Latest Jalgaon News)

जळगाव जिल्ह्यात सर्वत्रच वाहन चोरीचे गुन्हे वाढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, किशोर निकम, उमेश भांडारकर, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे अशांच्या पथकाने गुरुवारी (ता. १५) दाणा बाजारात सापळा रचून विनानंबरप्लेट दुचाकींवरील रोहित तुळशीराम कोळी (वय १९, रा. चौगाव, ता. चोपडा) याला ताब्यात घेतले.

चौकशी केल्यावर त्याच्या जवळची दुचाकी चोरीची निघताच त्याला ताब्यात घेत. पोलिस प्रसाद देण्यात आला. संशयिताने दोन दिवसांच्या पाहुणचारात तब्बल १५ मोटारसायकली काढून दिल्या आहेत. या गुन्ह्यातील त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला असून त्याचा शोध सुरु आहे. त्याच्या अटकेनंतर इतरही वाहने मिळण्याची शक्यता निरीक्षक ठाकुरवाड यांनी व्यक्त केली आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांची उपस्थित होते.

हेही वाचा: Fraud Case : मोबाईल वितरकाकडून 4 कोटींची फसवणूक

एसपींनी थोपटली पाठ

पोलिस ठाणे पातळीवर तीनच दिवसात गुन्हेशोध पथकाने तब्बल २६ चोरीची वाहने जप्त केल्याने या टीमच विशेष कौतुक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले असून त्यांना रिवॉर्डही दिला जाणार आहे.

गुन्हेगारांच्या साथीने बनला चोर

रोहित कोळी याला आई-वडील नसून तो, दहावीपर्यंतच शाळा शिकला. गावातील त्याचे नातेवाईक मित्र वाहन चोरीच्या गुन्ह्यात असल्याने त्याच्या सोबत पहिली चोरी करुन त्याने या धंद्यात प्रवेश केला. चोपडा तालुक्यात चोरट्यापद्धतीने चालवल्या जाणाऱ्या वेश्यालयात आलेल्या आंबट शौकीनांची दुचाकी चोरल्यानंतर एका पाठोपाठ वाहन चोरीचा सपाटाच लावला.

हेही वाचा: Leopard Attack : सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Web Title: 15 Bikes Stolen From Surat Nashik Seized Latest Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..