संत सेवालाल महाराज सभागृहासाठी 15 लाख : पालकमंत्री पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Gulabrao Patil

संत सेवालाल महाराज सभागृहासाठी 15 लाख : पालकमंत्री पाटील

जळगाव : बंजारा समाजबांधव अतिशय कष्टाळू असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. संत सेवालाल सभागृहासाठी १५ लाख रुपयांचा निधी देऊ, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रामदेववाडी (ता. जळगाव) येथे गुरुवारी (ता. १२) केली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ८३ लाख रुपयांच्या कामांचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

या कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत, पेव्हरब्लॉक, भूमिगत गटर, व्यायामशाळा, शाळा वॉलकंपाऊंड, डांबरीकरण, वीजखांब व डीपी आदी कामांचा समावेश असून, यातील काही कामांचे भूमिपूजन तर काहींचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा: जळगाव महापालिकेत कामात कसूर करणाऱ्या 41 कर्मचाऱ्यांना नोटीस

जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, दक्षता समितीचे सदस्य अर्जुन पाटील, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, रोहयोचे तालुकाध्यक्ष रवींद्र कापडणे, शिरसोलीचे माजी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच हुका राठोड, माजी सरपंच उदय चव्हाण, संतोष राठोड, दीपक राठोड, राजेश राठोड, गोपीचंद चव्हाण, सुनील राठोड, देविदास राठोड यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील व मान्यवरांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गावातील विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. गावातील ५२ कुटुंबांना १२ अंक क्रमांकाच्या रेशनकार्डवाटप करण्यात आले.
दक्षता समितीचे सदस्य अर्जुन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे गोपीचंद चव्हाण यांनी आभार मानले.

हेही वाचा: जळगाव : वीटभट्ट्यांच्या धुरामुळे कोंडला श्‍वास

Web Title: 15 Lakhs For Sant Sewalal Maharaj Hall Guardian Minister Gulabrao Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top