Jalgaon News : हतनूर धरणाचे 16 दरवाजे खुले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

hatnur dam
hatnur damesakal

Jalgaon News : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला असून, धरणाची पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी धरणाचे १६ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडण्यात आले. (16 gates of Hatnur Dam opened jalgaon news)

धरणातून सध्या ५० हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तो वाढण्याची शक्यता लक्षात घेता तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

hatnur dam
Eknath Khadse : सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र यावे; एकनाथ खडसेंचे आवाहन

त्यामुळे हतनूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढत होत आहे. परिणामी, धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडले आहेत. त्यातून सध्या ४९ हजार ७२४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

विसर्ग वाढण्याची शक्यता

दरम्यान, धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाचे दरवाजे खुले असल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

hatnur dam
No hawkers zone : नो-हॉकर्स झोन आजपासून कार्यान्वित; विक्रेत्यांना गाड्या न लावण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com