मुलीचा खून करणारा पित्यासल अटकेत

arrest
arrestesakal

जळगाव : दोन महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून देत खून करणाऱ्या संशयित पित्याला गुन्हे शाखेच्या पथकाने पाचाकरा येथून अटक केली आहे. जितेंद्र ऊर्फ नाना जंगलू ठाकरे (रा. कराब, भडगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

arrest
Jalgaon : तब्बल 16 वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेतील आरोपीला अटक

जितेंद्र ठाकरे याचे पत्नीसेाबत भांडण झाले होते. याच वादातून त्याने दोन महिन्यांच्या मुलीस शेतातील विहिरीत फेकून दिले. ग्रामस्थांनी पाहिल्यावर त्याने स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र काही तरुणांनी त्याचा जीव वाचवून त्याला बाहेर काढले. उपचारार्थ दाखल असताना त्याने पळ काढला हेाता.

भडगाव पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित जितेंद्रचा पोलिस शोध घेत असताना गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराने जितेंद्रची माहिती कळविली. त्यांनी तत्काळ पथक रवाना करून संशयिताला पाचोरा येथून रविवारी रात्रीच अटक केली असून, त्यास भडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

arrest
अल्पवयीन मुलीस दोघांनी फूस लावून पळविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com