2 भावंडाना पिंप्राळ्यात मारहाण | jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

2 भावंडाना पिंप्राळ्यात मारहाण

जळगाव : पिंप्राळ्यातील गुरूदत्त कॉलनीत दोन भावंडांना मारहाण करून तीन दुचाकींचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रकाश कोळी (रा. मढी, पिंप्राळा), महेंद्र सपकाळे ऊर्फ दादू (बुद्धनगर, पिंप्राळा), उमाकांत वाघ (मीराबाईनगर, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरुण, अशा चौघांनी विजय चव्हाण यांच्या घरासमोर येऊन आरडाओरड करून शिवीगाळ करीत होते. विजय चव्हाण याने त्यांना हटकले असता, चौघांनी घराच्या खिडक्या, दरवाज्यांचे नुकसान केले, तर तीन दुचाकींची आदळआपट करून नुकसान केले. विजय चव्हाण व त्याच्या भावाला चौघांनी शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस नाईक श्रद्धा रामोशी तपास करीत आहे.