Jalgaon : दुचाकीस्वार आदळला कारच्या दारावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident news

Jalgaon : दुचाकीस्वार आदळला कारच्या दारावर

जळगाव : अचानक कारचा दरवाजा (Car Door) उघडल्याने मागून येणारा दुचाकीस्वार कारवर आदळून अपघात (Accident) घडला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाल्याची घटना ममुराबाद कृषी फार्म हाऊसजवळ घडली. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (2 wheeler collided with car door Jalgaon accident news)

हेही वाचा: नाशिक : आस्थापना खर्च घटल्याने मनपात नोकर भरतीचा मार्ग सुकर

जळगाव तालुक्यातील नशिराबादमधील खालची अळीतील चेतन सोपान रोटे (वय ३५) हे वास्तव्यास असून ते (एमएच १९ बी ६२३०) क्रमांकाच्या दुचाकीने ममुराबाद येथून जळगावकडे येत होते. यावेळी सचिन एकनाथ देशमुख (रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) हे त्यांची (एमएच १९ सी डबल्यू ५७८२) क्रमांकाच्या कार भरधाव वेगाने चालवीत होते. यावेळी रोटे यांना कारने मागून ओव्हरटेक करीत कार रोटेंच्या दुचाकीपुढे आणत अचानक थांबविली. त्यानंतर कारचालकाने रस्त्यावर कार उभी करुन कारचा दरवाजा उघडला. कारचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मागून दुचाकीवर येणारे रोटे कारवर जाऊन आदळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी जखमींच्या तक्रारीवरून कारचालक सचिन देशमुख यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास साहेबराव पाटील करीत आहे.

हेही वाचा: प्रभाग क्रमांक 44 बाबत उच्च न्यायालयात याचिका

Web Title: 2 Wheeler Collided With Car Door Jalgaon Accident News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonaccident case
go to top