Jalgaon : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

late amarsingh chavan
late amarsingh chavanesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : ट्रकने रिव्हर्स घेऊन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजता चाळीसगाव - कन्नड रोडवरील एका ढाब्याजवळ घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(2 wheeler driver killed in truck collision jalgaon accdient news)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पाथर्डे येथील अमरसिंग भावसिंग चव्हाण (वय-४२) वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. शेती कसून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतो. दरम्यान अमरसिंग चव्हाण हे आपल्यासोबत एकाला घेऊन दुचाकीने (क्र. एम.एच.१९ बीपी १४२८) चाळीसगाकडे जात असताना चाळीसगाव - कन्नड रोडवरील हरहरभोले ढाब्याजवळ ट्रकवरील (क्र. जीजे ०३ बीव्ही ६०३२) चालकाने (नाव माहित नाही) ट्रक रिव्हर्स घेतला. तेव्हा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात अमरसिंग चव्हाण हे ट्रकच्या मागील चाकाखाली दाबले गेले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, २१ रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे.

late amarsingh chavan
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने घेतला गळफास

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघात घडताच चालक पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचनामा केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ राजेंद्र साळुंखे हे करीत असून चव्हाण यांच्या पाश्चात्य दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

late amarsingh chavan
Nashik : प्रॉपर्टी वादातून माथेफिरु मुलाने आई वडीलांना पाठविले यमसदनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com