Jalgaon News : जिल्ह्यातील 2 महिलांचा ‘उष्माघात’सदृश स्थितीने मृत्यू

death
death esakal

Jalgaon News : ‘मे हिट’मध्ये सूर्य आग ओकत असल्याने जिल्ह्यातील अमळनेर व रावेर येथील दोन महिलांचा ‘उष्माघात’सदृश स्थितीमुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) घडली. (2 women in district died of heat stroke like conditions jalgaon news)

रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३, रा. तांबेपुरा, अमळनेर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही विवाहिता अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेलेली होती. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर त्यांना ऊन लागल्याने अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथील खासगी डॉक्टरांना दाखवले.

डॉक्टरांनी ऊन लागल्याचे सांगून गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर थोडा वेळ महिलेला बरेही वाटले. मात्र, सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या, मळमळ व चक्कर आल्याने त्यांना घरच्यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास तत्काळ रिक्षाने शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी महिलेचे विच्छेदन केले. याबाबत पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death
Jalgaon News : चित्रा- न्यायालय चौकापर्यंत अतिक्रमण हटविले; महापालिकेला मिळाला मुहूर्त!

मयत रूपाली राजपूत यांच्या पश्‍चात पती, सासू- सासरे, दीर असा परिवार आहे. गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी व मंगलसिंग राजपूत यांच्या त्या मोठ्या स्नुषा होत. दरम्यान, ही घटना लक्षात घेता भर उन्हात विवाह सोहळ्यास जाणे शक्यतो टाळावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देत नागरिकांना उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

रावेरला विवाहितेचा मृत्यू

येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी विवाहितेचा वरणगाव येथे शुक्रवारी (ता. १२) दुपारी मृत्यू झाला. उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नम्रता दिनेश चौधरी (वय ३९) या परिवारासोबत वरणगाव येथे नातलगांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.

कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी जेवण करून परत येत असताना बसस्थानकावर त्यांना चक्कर येऊन उलटीही झाली. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

death
Temperature Rise : सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सर्वांत हॉट! तापमानाचा पारा 46 अंशांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com