Jalgaon News : आयुष्याची शतकोत्तरी खेळी, कुटुंबही एकसंघ! गायकवाड यांच्या संस्काराची शिदोरी

gaikwad family
gaikwad familyesakal

Jalgaon News : पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील डॉ. दोधू दगडू गायकवाड यांनी आपल्या आयुष्याची शतकी खेळी अनेक अडथळ्यांना सामोरे जात पार केली. पतवंडांना सोबत खेळीमेळीच्या वातावरणात पुढील वाटचाल करीत आहेत. (20 people together in family as an ideal family in Maheji village jalgaon news)

आजच्या धकाधकीच्या जीवनात २० जणांचे एकत्र कुटुंबात एकमेकांचे विचार जुळवत माहेजी गावातील एक आदर्श कुटुंब म्हणून पंचक्रोशीसह आप्तेष्ठांत सर्वदूर परिचित आहे.

सुरवातीच्या काळात १९५५ मध्ये वरखेडी (ता. पाचोरा) येथील डॉ. दोधू दगडू गायकवाड यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत माहेजी येथे डॉक्टर म्हणून सेवा सुरू केली. त्या काळी हा संपूर्ण परिसर दाट जंगलाने वेढलेला होता.

त्या मुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याविषयीच्या अडचणीत देवदूत बनून वाहनांची कुठलीही व्यवस्था नसल्याने व हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याने राणीचे बांबरुडपर्यंत रुग्णसेवेसाठी बैलगाडीने जात स्वरंक्षणाच्या दृष्टीने बंदुकीचा परवाना त्यांना मिळालेला असून, आज देखील आहे. कालांतराने लहान बंधू डॉ. रघुनाथ गायकवाड यांचे देखील डॉ. शिक्षण पूर्ण करून दोन्ही भावांनी सेवा दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gaikwad family
Caste Certificate : आदिवासी टोकरेकोळी जातप्रमाणपत्र मिळणार सुलभ पद्धतीने!

मोठे डॉक्टर व लहान डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. मोठे डॉक्टर यांना दोन मुले होती. मोठे अशोक गायकवाड व लहान भालचंद्र गायकवाड. दोघांना पाच मुले व दोन मुली. सतरा वर्षे झाली, दोन्ही मुलांचे अल्प आजाराने निधन झाले. मोठा आघात वार्धक्यात होऊनही नातवांच्या पाठीमागे वटवृक्षाप्रमाणे खंबीरपणे उभे राहात दोन्ही मुलांचे दोन व तीन मुले त्यांचा संपूर्ण २० जणांचा परिवार एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत बाबांची सेवा देखील तत्परतेने करीत आहेत.

कृष्णा गायकवाड व दीपक गायकवाड त्यांची असलेली पंचवीस एकर शेती सांभाळतात. विलास गायकवाड शिक्षक, गजानन गायकवाड गाडी व्यवसाय, तर प्रदीप गायकवाड मेडिकल ही पाचही नातवंडे आपापला व्यवसाय सांभाळत आहेत. श्रीमती कोकिळाबाई, सत्यभामाबाई या दोन सुना असून शर्मिला, मनीषा, मीनाक्षी, प्रियंका, जयश्री या पाच नातसुना आहेत. सात पतवंडे आहेत. ज्याची त्याची कामे कुठलाही हेवा न करता हाशी खुशीने करतात.

संपूर्ण परिवारास एकच जेवण असते. दुपारी ज्याची त्याची कामे आटोपून जेवणाची वेळ असते. मात्र रात्री सर्व एकत्रित जेवणाला बसून दिवसभरातील कामाचा आढावा असो की नात्या गोत्याच्या, राजकारणाच्या गप्पा दिलखुलासपणे मारतात. पाहुणे मंडळींची वर्दळ मोठ्या प्रमाणात असूनही घरातील महिलांच्या चेहऱ्यावर ताणतणाव दिसून येत नाही.

gaikwad family
School Admission : पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ; पाल्याच्या भविष्याची चिंता

सुख दुःख असो की लग्नकार्य तेथे जाण्याचे नियोजन होऊन प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होतात. सर्वच राजकीय पक्षातील मंडळी गावात आल्यावर घरी आवर्जून येतात. बाबांची आस्तेवाईकपणे विचारपूस करतात. डॉ. बाबा म्हणून सर्वत्र परिचित आहेत.

बाबांनी १९६५ दरम्यान पाच वर्षे माहेजी गावाचे सरपंचपद उपभोगले आहे. त्याच काळात गावाला गिरणामाईच्या पुरापासून होणारा धोका टाळण्याचा दृष्टीकोण लक्षात घेत गावाचे पुनर्वसन केले आहे. गावाचे पुनर्वसन करतेवेळी प्रत्येक ग्रामस्थाला सुटसुटीत व मनमोकळ्या जागा वाटप करून गल्लीतून दोन ट्रक निघतील, अशा गल्ल्या केल्यात. गायकवाड (सोनार) कुटुंबीयांची नाळ माहेजी गावाशी जुळली आहे.

याबाबत कटुंब प्रमुख म्हणून डॉ. बाबा असले तरी संपूर्ण जबाबदारी मोठे नातू कृष्णा (राजू भाऊ) गायकवाड सांभाळतात. बाबा आमचे आधारवड असून, आमचे वडील व काका दोन्ही अचानक वारल्याने त्यांचे दुःख मनात ठेवून जो त्यांनी आधार देत एकत्र कुटुंबाचा वसा दिला, तो खूप काही शिकवतो. नुकताच अक्षतृतीयेच्या दिवशी बाबांचा शंभरावा वाढदिवस शंभर पुरणाचे दिवे लावून आम्ही साजरा केला.

"माजी आमदार (कै.) ओंकार आप्पा व आम्ही मित्र होतो. आप्पा पहिल्याच वेळी विधानसभेची निवडणूक लढवणार होते. आमचा उत्साह तितकाच होता. तेव्हा निवडणूक लढवण्यास फार खर्च येत नसे, मग आम्ही मित्र परिवाराने पंचवीस, पन्नास पैसे लोकवर्गणी केली. दोनशे बेचाळीस रुपये जमा झाले व त्यातून खर्च करत आप्पा विजयी झाले. आमच्या आनंद न सांगण्या जोगा होता. त्या वेळी पंचवीस पैशाची पावती देखील आम्ही दिली होती." - डॉ. दोधू गायकवाड, माहेजी, ता. पाचोरा

gaikwad family
Jalgaon News : दुसरीसोबत बोहल्यावर चढणारा दादला मंडप सोडून पळाला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com