Jalgaon News : मावशीची भेट घेऊन घरी जाण्यासाठी निघाला अन....

death
deathesakal

जळगाव : धावत्या रेल्वेतून (Railway) तोल जाऊन पिंप्राळा येथील २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव विजय बारी (वय २०, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ( 20 year old youth fell from running railway died during treatment jalgaon news)

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात प्रणव बारी हा आई-वडिलांसह गांधी चौकात वास्तव्याला होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी (ता १०) प्रणव हा आई ज्योती बारी यांच्यासोबत भुसावळ येथे मावशीकडे भेटण्यासाठी गेला होता. मावशी व मावस भावाला भेटून रविवारी (ता. १२) प्रणव हा आईसोबत जळगाव येथे येणासाठी निघाला.

रेल्वे जात असताना प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून आई देखत खाली पडला. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. रेल्वे थांबवून आईने धाव घेतली.

भुसावळ येथे राहणाऱ्या बहिणीच्या मुलगा राकेश याने घटनास्थळी धाव घेऊन प्रणवला गोदावरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी नऊला त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

death
Amrut Yojana : अमृत’ला अडथळा ठरणारी पिंप्राळ्यातील झोपडी हटविली; अतिक्रमण विभागाची कारवाई

मुलाच्या मृत्यूमुळे आई ज्योती बारी यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. प्रणवची मोठी बहीण स्वामिनी ही पुण्यात नोकरी करत असून, प्रणव हा बहिणीसोबतच राहात होता. वडील कांदा-बटाटे विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात.

प्रणवच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death
Jalgaon News : दिव्यांग मुख्याध्यापिका डायलिसिस वर; शासनाने वेतन थकविल्याने उपासमारीची वेळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com