Maha Shivpuran Katha: श्री शिवमहापुराण कथेसाठी एसटीचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष; दररोज 200 जादा बसगाड्या

pradip mishra
pradip mishraesakal
Updated on

Maha Shivpuran Katha : पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन जळगावपासून काही अंतरावर असलेल्या वडनगरी फाटा भागात ५ ते ११ डिसेंबरदरम्यान, होत आहे. (200 more buses per day for shiv mahapuran katha jalgaon news)

या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे कथेच्या सर्व दिवस दररोज २०० जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना कथेच्या ठिकाणी पोचणे सोयीचे होणार आहे.

वडनगरी फाटा (ता. जळगाव) येथील असलेल्या बडा जटाधारी महादेव मंदिर येथे श्री शिवमहापुराण कथा होत आहे. कथेसाठी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. ही गर्दी लक्षात घेता महामंडळ विविध बसस्थानकातून बसगाड्या थेट श्री शिवमहापुराण कथेच्या वाहनतळापर्यंत सोडणार आहे. बसगाड्या सकाळपासून सायंकाळपर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी दिली.

चोपडा, यावल आगारातून बसगाड्या

महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे विविध बसस्थानकातून जादा बसगाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन श्री शिवमहापुराण कथेसाठी करण्यात आले आहे. त्यात जळगावसह यावल व चोपडा आगारातील बसगाड्या असतील. जळगाव बसस्थानकातून दररोज १००, तर यावल व चोपडा आगारातून एकूण १०० बसगाड्या सोडण्यात येतील.

pradip mishra
Malegaon Shivpuran Katha : शिवमहापुराण कथेमुळे बदलली मालेगावची प्रतिमा

३ ठिकाणी वाहनतळ

कथेच्यास्थळी विविध मार्गावरून येणाऱ्या वाहनांना तीन ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. चोपडा, अमळनेर, चाळीसगावकडून येणाऱ्या वाहनांना वेगळे वाहनतळ, तर भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, रावेरकडून येणाऱ्या वाहनांना वेगळे वाहनतळ आहे.

याठिकाणी एसटी महामंडळातर्फे तात्पुरते नियंत्रण कक्ष तयार करून भाविकांना एसटी बसगाड्यांची माहिती दिली जाणार आहे.

pradip mishra
Shivpuran Katha : शिवपुराण कथेसाठी मुस्लिमाची जमीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com