Jalgaon News : विस्तारित भागातील रहिवाशांच्या नशिबी ‘वनवास’; हद्दवाढीचा प्रश्‍न प्रलंबितच

Municipal building.
Municipal building.esakal

Jalgaon News : येथील नगरपरिषदेची स्थापना १८६४ मध्ये झाली. स्थापनेनंतर पालिकेच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. शहराच्या विकासासाठी त्या त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांनी मूलभूत विकासाला प्राधान्य दिले. त्यानुसार अनेक योजना मार्गी देखील लागल्या. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाढीचा विषय रखडला आहे.

त्यामुळे पालिकेच्या हद्दीबाहेरील राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या सुटत नसल्याने नवीन वसाहतीत राहणे म्हणजे गुन्हा का? असा प्रश्न वसाहतधारकांना निर्माण झाला आहे. त्यामुळे वसाहतधारकांचा हा विषय तत्काळ नवीन मुख्याधिकारी यांनी सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे. (For many years issue of increasing limit of parola municipality was stalled jalgaon news)

शहराच्या हद्दवाढीबाबत २६ जून २०१९ ला लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक (२०९) मांडला होता. त्यानुसार पालिकेने प्रस्ताव तयार करून नगरचना विभागाकडे पाठविला होता.

सुरुवातीला त्यात ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करून पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पारोळा शहराच्या हद्दवाढीबाबत योग्य तो पाठपुरावा होत नसल्यामुळे हा विषय दुर्लक्षित होत असल्याची चर्चा शहरवासीयांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.

सद्यस्थितीत मुख्याधिकारी म्हणून सावदा येथील पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्याधिकाऱ्यांपुढे आरोग्य, पाणी तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांबरोबर हद्दवाढीचा प्रश्न देखील आव्हानात्मक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

हद्दवाढीनंतरचे क्षेत्रफळ

पारोळा पालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ ४.२८ चौरस किलोमीटर आहे. हद्दवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेच्या हद्दीचे क्षेत्रफळ १२.४९ चौरस किलोमीटर होईल.

Municipal building.
Raksha Khadse : खासदार रक्षा खडसेंचा खुला दावा अन्‌ भाजपपुढे पेच

या हद्दवाढीमुळे जे रहिवासी सध्या ना पालिकेच्या हद्दीत आहेत, ना ग्रामपंचायतीच्या अशांना पालिकेकडून आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील.

या भागांचा होणार विस्तार

शहरातील अमळनेर व धरणगाव रस्त्याकडील वंजारी शिव, बहादपूर रस्त्याकडील बोदर्डे शिव, उंदिरखेडे रस्त्याकडील उंदीरखेडे शिव, कजगाव रस्त्याकडील टेहू शिव, चोरवड रस्त्याकडे कामतवाडी शिव व म्हसवे रस्त्याकडील म्हसवे शिव आदी भागाकडील क्षेत्रफळ वाढणार आहे.

"गेल्या पाच, सहा वर्षांपासून अमळनेर रस्त्यालगत असलेल्या गायत्रीनगर परिसरात रहिवासी म्हणून राहत आहे. हद्दवाढ नसल्याने पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट व अनेक सुविधा पालिकेकडून मिळत नाहीत." - दिलीप चौधरी, रहिवासी

"पारोळा पालिकेचा दोन दिवसांपूर्वीच पदभार घेतला आहे. शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील." - किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, पारोळा

Municipal building.
Jalgaon Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले शनिवारी जळगाव जिल्ह्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com