जळगाव : नगर परिषदांच्या प्रभागरचनेवर 260 हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Objection

जळगाव : नगर परिषदांच्या प्रभागरचनेवर 260 हरकती

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ नगर परिषदांच्या प्रभागरचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ नगर परिषदांवर सुमारे २६० तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींवर सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होइल. सर्वच भावी नगरसेवक व राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागून आहे.

‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

जिल्ह्यातील १५ नगर परिषदांची मुदत डिसेंबर २०२१ अखेर संपुष्टात आली आहे. या नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त आहेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका स्थगित ठेवण्याबाबत राज्य शासनाने कायदादेखील केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदांच्या प्रभागरचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर करून निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे.

हेही वाचा: 14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!

जिल्ह्यात भुसावळ पालिका ‘अ’ वर्गात असून, ‘ब’ वर्गातील अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा आणि ‘क’ वर्गातील भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, सावदा, यावल, रावेर, नशिराबाद या नगर परिषदांसाठी प्रभागरचनेवर १४ मे या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्याची सुनावणी येत्या २३ मेस जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. ३० मेस हरकती व सूचनांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. तर ६ जूनला अंतिम प्रभागरचनेस मान्यता दिली जाणार आहे.

पालिकानिहाय तक्रारी अशा -

अमळनेर - ३७

भुसावळ - ८०

वरणगाव - २४

फैजपूर - २३

नशिराबाद - २२

रावेर - १५

धरणगाव - १३

चाळीसगाव - १२

चोपडा - ११

एरंडोल - ८

यावल - ६

भडगाव - ५

पारोळा - १

सावदा - २

हेही वाचा: ''कोणाच्या गाडीवर पाहीले'' विचारल्याचा आला राग; विवाहितेस मारहाण

Web Title: 260 Objections On Ward Composition Of Municipal Councils In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top