Pimprala Railway Flyover: पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलावरून ‘बायपास’ला जा 5 मिनिटांत..! पुलाचे 98 टक्के काम पूर्ण

Conceptual image of railway flyover. The second photograph shows the completion of the Pimprala railway flyover near Bhoitenagar
Conceptual image of railway flyover. The second photograph shows the completion of the Pimprala railway flyover near Bhoitenagar esakal

Pimprala Railway Flyover : शहरवासीयांसाठी मोठी सुविधा आणि विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर हा पूल जळगावकरांसाठी खुला होईल. सोबतच वर्षभरात तयार होणाऱ्या ‘बायपास’ चौपदरी महामार्गावर या पुलावरून जळगावकरांना अवघ्या काही मिनिटांत पोचणे शक्य होणार आहे.

पिंप्राळा रेल्वेगेट हा जळगाव शहराच्या अर्ध्या भागाला मुख्य शहराशी जोडणारा दुवा आहे. (98 percent work of Pimprala railway flyover completed jalgaon news)

गेटच्या पलीकडे रांगेने भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, प्रेमनगर, एसएमआयटी, मुक्ताईनगर, निवृत्तीनगर पुढे गुड्डूराजा नगर महामार्गाच्या पलीकडे पिंप्राळा, हुडको, मार्गाच्या दुतर्फा दादावाडी, खोटेनगर, आहुजानगर, अष्टभुजा नगर आणि थेट गिरणा नदीपर्यंतचा परिसर शहराच्या हद्दीत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महामार्ग वगळता केवळ पिंप्राळा रेल्वेगेट हाच पर्यायी मार्ग होता.

अडचण अन्‌ गेटची आवश्‍यकता

संपूर्ण परिसरातून जळगाव शहरात येण्यासाठी पिंप्राळा रेल्वेगेटचा अधिक वापर होत होता. मात्र, मध्येच रेल्वेच्या जळगाव-मुंबई रेल्वेलाइनवर असल्याने या मार्गावरील अविरत रेल्वे वाहतूक दिवसातून अनेकदा रेल्वेगेटवरील वाहतूक प्रभावित करत होती. रेल्वेगाड्यांची मालिकाच दिवसभरात असल्याने अनेकदा हे गेट अर्धा-पाऊण तास बंद असायचे. त्यामुळे गेटच्या दुतर्फा वाहनधारकांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे या गेटवर उड्डाणपूल होणे गरजेचे होते.

अखेर पुलाचे काम मंजूर

अनेक वर्षांपासून जळगावकरांची रेल्वेगेटवर उड्डाणपुलाची मागणी होती. मात्र, भरवस्तीत हे गेट असल्याने दोन्ही बाजूंकडील रहिवाशांची संमती, काही प्रमाणात जागेचा प्रश्‍न होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कामासाठी पुढाकार घेऊन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी दिली.

Conceptual image of railway flyover. The second photograph shows the completion of the Pimprala railway flyover near Bhoitenagar
Jalgaon Crime: श्री शिवमहापुराण कथास्थळी चोरीप्रकरणी राजस्थानातील महिलांच्या टोळीला अटक

राज्य-केंद्राचा निधी

राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. साधारणतः अडीच वर्षांपूर्वी त्याचे काम सुरू झाले. आता हे काम पूर्णत्वास आले आहे.

कामाचा तपशील

जळगाव-शिरसोली स्थानकादरम्यान जळगाव जंक्शनलगत हा पूल होत आहे. ‘महारेल’ या एजन्सीद्वारे पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा एकच पूल मुंबई रेल्वेलाईन व पलीकडे पश्‍चिम मार्गावरील सुरत लाइनवरील ‘गेट कव्हर' करतो. पुलाला दोन ‘लेन' असून एकूण लांबी १.१ किलोमीटर आहे. पुलाच्या मुख्य मार्गालगत रिंगरोड, भोईटेनगरसह सुरत लाइन ‘क्रॉस' करून पुढे दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते बनवण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

० पुलाच्या कामात ‘कंपोझिट' स्टील गर्डर्सचा वापर

० आरसीसीचे ५४ गर्डर्स बसविण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण

० पुलाच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर' या नव्या प्रणालीचा वापर

० ‘युटीलिटीज' व्यवस्था, तपासणी व दुरुस्ती, ‘युटीलिटी डक्ट'ची व्यवस्था

० रात्रीच्या दृष्यमानतेसाठी दूरस्थ नियंत्रित ‘थीम'वर आधारित एलईडी पथदीप

० सजावटीच्या कमानींसाठी एलईडी दिव्यांची सुविधा

Conceptual image of railway flyover. The second photograph shows the completion of the Pimprala railway flyover near Bhoitenagar
Adv Chavan Accomplice Arrest Case: निखिल आळंदेची अटक कायदेशीर नाही; कोर्टाचे स्पष्टीकरण

प्रवासाची सुविधा

मध्य रेल्वेच्या मुंबई लाइनवर जळगाव-शिरसोली स्थानकादरम्यान जळगाव शहरात भोईटेनगरजवळ हा पूल तयार झाला आहे. शहरातील रिंगरोडपासून मुंबई लाइनवरून हा पूल असून उड्डाणपुलावरून एक रस्ता सरळ सुरत लाइनवरील रेल्वेगेटकडे, तर दुसरा रस्ता भोईटेनगरकडे जातो.

त्यामुळे एकाच पुलावरून मुंबई-सुरत अशा दोन्ही रेल्वेलाइनवरील ‘गेट कव्हर' होतात. हा पूल सुरत लाइन ‘क्रॉस' करून नव्याने झालेल्या सुरेश कलेक्शनजवळ उतरतो. पुढे हा रस्ता थेट कानळदा मार्गाला जाऊन मिळतो.

म्हणजे, एकीकडे पिंप्राळ्यासह या मार्गावरील सर्व परिसर, महामार्गाच्या दुतर्फा वाढलेले शहर, महामार्गाशी ‘कनेक्ट' आणि आता नव्याने तयार होत असलेल्या ‘बायपास’ महामार्गाशी कानळदामार्गे अवघ्या पाच मिनिटांत पोचू शकेल, अशी व्यवस्था या पुलाने केली आहे.

"रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २०१८ मध्ये ‘महारेल’ची स्थापन झाली. पाच वर्षांत ‘महारेल’ने पुलांसह अन्य कामांचे जाळे राज्यात सर्वत्र उभारले. या पुलाचे काम आव्हान म्हणून स्वीकारत ते गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि सुरक्षेशी तडजोड न करता वेळेत पूर्ण होत आहे, त्याचे समाधान वाटते." - विनीत टोके, प्रकल्प अभियंता, ‘महारेल'.

Conceptual image of railway flyover. The second photograph shows the completion of the Pimprala railway flyover near Bhoitenagar
Jalgaon News: ‘बालकल्याण’च्या ‘त्या’ सदस्यांना बरखास्त करा : ॲड. रोहिणी खडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com